पत्र लिहून कुणाला वेड्यात काढताय, आम्ही काय डोक्याला गोडं तेल लावतो? अंधारेंनी घेतला फडणवीसांचा समाचार

  • Written By: Published:
पत्र लिहून कुणाला वेड्यात काढताय, आम्ही काय डोक्याला गोडं तेल लावतो? अंधारेंनी घेतला फडणवीसांचा समाचार

Sushama Andhare : सध्या जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नबाब मलि (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते. यामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं आणि मलिक महायुतीचा भाग होणं योग्य ठरणार नाही, असं म्हटलं. यावरून आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी (Sushama Andhare) फडणवीसांवर टीकास्त्र डागलं.

RBI Repo Rate | रेपो रेट जैसे थे; सामान्यांचा फायदा की तोटा? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi 

आज शिवसेनेचा जाहीर मेळावा पुण्यात झाला. यावेळी बोलतांना अंधारे म्हणाल्या की, फडणवीस आम्हाला शिल्ल्क सेना म्हणत असतात. तेव्हा त्यांनी महाप्रबोधन यात्रेची गर्दी बघावी. त्यांच्याकडे सर्वकाही आहे. त्यांच्याकडे मोदी आहेत, शाह आहेत. ई़डी आहे. पटेल-भुजबळ, भावना गवळीही आहे. तुमच्याकडे शरण जाणारे अनेक असतील. पण, आमच्याकडे निष्ठावंत आहेत. मरण पत्करेल, पण शरण जाणार नाहीत असे संजय राऊत आहे. आमच्याकडे वाघ आहेत, शेळ्या-मेंढ्या नाहीत, असा टोला त्यांनी लगावाला.

पुण्यातील मिलिटरी अकादमीचे 5 विद्यार्थी देवगडच्या समुद्रात बुडाले, चौघांचे मृतदेह हाती, एक बेपत्ता 

काल फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. अंधारे म्हणाल्या, करून करून भागलं अन् देव पूजेला लागलं. फडणवीसांना आणि भापजला सत्तेपक्षा देश मोठा वाटतो. मात्र, सत्तेपेक्षा देश मोठा वाटणारी भाजप आता नाही. ती भाजप फार वेगळी होती. ज्यात अटल बिहारी वाजपेयींसारखे नेते होते. लोकतंत्र वाचलं पाहिजे, ही भूमिका वाजपेयींच्या भाजपची होती. त्या भाजपला कधीच तिलांजली दिली. मलिक सत्ताधारी बाकावर दोन दिवस बसले. ते सहजासहजी सत्ताधारी बाकावर बसले नाहीत. ते बसतात, म्हणजे त्यांचं पक्क ठरलेलं असतं. सर्व चर्चा झाल्यानंतरच ते सत्ताधारी बाकावर बसले. मात्र, हा डाव आपल्यावर उलटू शकतो, असं लक्षात येताच फडणवीसांनी तो मी नव्हेच म्हणत पत्र लिहिलं. हे रोज भेटतात, मग पत्र लिहायंची काय गरज होती, असा सवाल अंधारेंनी केला. पत्र लिहून कुणाला वेड्यात काढताय, आम्ही डोक्याला गोडं तेल लावतोय का, असंही अंधारे म्हणाल्या.

आम्ही भरलेल्या टॅक्सचा पैसा अधिवेशनावर खर्च होता. आमचे प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा होणं अपेक्षित असतं. मराठा आरक्षण, धनगर आरक्षणावर चर्चा होण्याची गरज आहे. मात्र, मलिक प्रकरणावर चर्चा होतेय. हा विषय जाणीवपूर्वक चर्चेला आणला, असंही अंधारे म्हणाल्या.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube