Download App

तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात? इस्रायल-इराण आमने-सामने, सूडयुद्धाचा इशारा …

Israel Operation Rising Lion On Iran Massive Strikes : इस्रायलच्या ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ या कारवाईने मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली (Israel Operation Rising Lion)आहे. या कारवाईत इराणच्या वरिष्ठ लष्करी कमांडरचा मृत्यू झाला असून, इराणच्या अणुकार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचं समोर आलं आहे. इस्रायलच्या (Israel Iran Conflict) ऑपरेशन रायझिंग लायनने अरबमध्ये तिसऱ्या महायुद्धाचा धोका ()  निर्माण केला आहे.

या घटनेनंतर इराणने स्पष्ट इशारा दिला आहे की, इस्रायलला याची मोठी किंमत मोजावी लागेल. तज्ज्ञांच्या मते, इराण जर थेट इस्रायलवर प्रतिहल्ला करत असेल, तर या संघर्षाची झळ संपूर्ण अरब जगताला बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अरब राष्ट्रांमध्ये फूट पडू शकते आणि काही देश एकमेकांविरुद्ध उभे राहू शकतात. या संघर्षाचे रूपांतर अणुयुद्धाच्या टोकाला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणचे प्रतिहल्ले आज रात्रीपासून सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, त्यामुळे संपूर्ण क्षेत्रात तणाव अधिकच वाढू शकतो.

‘या’ राशींच्या लोकांना आज मिळणार नवीन संधी, भरपूर फायदे होणार

खामेनी यांची घोषणा

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खमेनी यांनी म्हटले आहे की, यासाठी इस्रायलला कठोर शिक्षा दिली जाईल. इराणने त्यांच्या भूमिगत क्षेपणास्त्र शहरातून दारूगोळ्याचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. येथे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मोठा साठा आहे. इराणने इस्रायलवर 100 ड्रोन हल्ले केले आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री काट्झ यांनी आणीबाणी लागू केली आहे. संपूर्ण इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या इशारा देणारे सायरन वाजत आहेत.

इस्रायलने अतिरिक्त हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे. अमेरिकेने आपल्या राजदूतांना आश्रयस्थानांमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. इस्रायली हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वात मोठे नुकसान झाले असल्याने जॉर्डन, इजिप्त, कतार, युएई विशेष सतर्कतेवर आहेत. अणुशक्ती बनण्याचे त्यांचे ध्येय आगीत जळून खाक झाले आहे. इस्रायली विमानांनी इराणवर हल्ला करण्यासाठी उड्डाण केले. या कारवाईत जॉर्डन, सीरिया आणि इराकच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यात आला.

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन अन् व्हेज-नॉनव्हेज हॉटेल मालकांना कारवाईचा इशारा

कारवाईत जॉर्डनचा सहभाग

सीरिया आणि इराकसारखे युद्धग्रस्त देश हवाई संरक्षण प्रणालींपासून सुरक्षित नाहीत. परंतु, इस्रायली विमाने जॉर्डनच्या हवाई हद्दीतून गेली याचा अर्थ असा की, जॉर्डन देखील या कारवाईत सहभागी होता. अमेरिकेकडून इस्रायलला हवेत इंधन भरण्यासाठी आणि हल्ल्यांसाठी त्यांच्या हवाई हद्दीचा वापर करण्याची परवानगी देण्याचे आदेश मिळाले होते. या हवाई हद्दीचा वापर करून इस्रायलने तबरेज, केरमंशाह, तेहरान, अरक, नतांज आणि इस्फ़हानवर हल्ला केला. यामध्ये अणु कार्यक्रमाशी संबंधित चार ठिकाणांचा समावेश आहे. तिथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इराणवरील हल्ल्यांनंतर अरब देशांमध्ये तिसऱ्या महायुद्धाची समीकरणे तयार होऊ लागली आहेत, कारण इस्रायलच्या मोक्याच्या ठिकाणांवर हल्ले निश्चित आहेत. यानंतर, संपूर्ण अरब जगाला आपली भूमिका ठरवावी लागेल. इराणने मोठ्या हल्ल्याची तयारी केली आहे. प्रश्न असा आहे की, इराणचे लक्ष्य काय असू शकते. तर इराण इस्रायलच्या अणुस्थळांवर हल्ला करू शकतो.

हाय प्रोफाइल नेते रडारवर

इराण नेगेव वाळवंटातील दिमोना अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला करू शकतो. इस्रायलचा मुख्य हवाई तळ आणि क्षेपणास्त्र तळ इराणचे लक्ष्य असू शकतो. तेल अवीवमधील हाय प्रोफाइल नेत्यांच्या तळांवर हल्ला होऊ शकतो. इस्रायलला या हल्ल्यांची भीती आहे, म्हणूनच पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना गुप्त ठिकाणी पाठवण्यात आले आहे. अरबमध्ये युद्धाचा बिगुल वाजला आहे आणि इराणी हल्ल्यांमुळे संपूर्ण अरब जगात युद्धाचे समीकरण तयार होतील.

अरब देशांमधील अमेरिकन छावणीतील सर्वात मोठा देश इस्रायल आहे आणि इस्रायलसोबत सौदी अरेबिया, जॉर्डन, युएई सारखे देश आहेत. इराण हा अमेरिकाविरोधी छावणीचा चेहरा आहे आणि इराणसोबत सीरिया, इराक, लेबनॉन आणि येमेन या प्रॉक्सी संघटना आहेत. इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या सरकारांनाही अमेरिकेशी थेट लढायचे नाही, म्हणूनच इराणला प्रॉक्सी संघटनांच्या मदतीने हे युद्ध लढावे लागेल.

 

follow us