Download App

मोठी बातमी : चांद्रयान – 3 प्रक्षेपणासाठी सज्ज, 12-ते 19 जुलै दरम्यान आकाशात झेपावणार

  • Written By: Last Updated:

chandrayaan-3 mission : चांद्रयान-3 मिशनचे (chandrayaan-3 mission) काम जवळपास पूर्ण झाले. या संबंधीच्या सर्वच चाचण्या मार्चमध्ये पूर्ण झाल्या असून आता ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे. येत्या 12 जुलै ते 19 जुलै दरम्यान, त्याचे प्रक्षेपण होईल, असे इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ (Dr. S. Somnath) यांनी सांगितलं. (ISRO chief Dr. S. Somnath said Chandrayaan-3 ready for launch, to fly between July 12-19)

 

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणे हा चांद्रयान-2 चा उद्देश होता. चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान सप्टेंबर 2019 मध्ये लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश झाले होते. त्यानंतर चांद्रयान-3 मोहीम सुरू करण्यात आली होती. दरम्यान, आता चांद्रकायन-3 मिशनचे काम पूर्ण झाले आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी बुधवारी सांगितले की, सध्या चांद्रयान-3 अंतराळयानाच्या आम्ही चाचण्या पूर्ण केल्या आहेत. 12 ते 19 जुलै दरम्यान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित होईल. मात्र, अचूक तारीख आम्ही लवकरच जाहीर करू, असं सोमनाथ म्हणाले. तर एका वृत्तानुसार, चंद्रावर चांद्रयान-3 मोहीम 13 जुलै रोजी प्रक्षेपित केली अशी माहिती आहे. ते 13 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल. चांद्रयान-3 मिशन जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल मार्क-III या प्रक्षेपकाद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर पाठवले जाणार आहे. ते चंद्रावर भारताचे सर्वात वजनदार रॉकेट असेल असं त्यांनी सांगितलं.

चांद्रयान-३ मध्ये स्वदेशी लँडर मॉड्यूल (LM), एक प्रोपल्शन मॉड्यूल (PM) आणि आंतरग्रहीय मोहिमांसाठी आवश्यक नवीन तंत्रज्ञानआणि प्रात्यक्षिक करण्याच्या उद्देशाने एक रोव्हर आहे. ही महत्त्वाकांक्षी मोहीम चार वर्षांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागावर क्रॅश-लँड केलेल्या चांद्रयान-2 मोहिमेला अनुसरून आहे.

“पुण्या-मुंबईतील बंगले शोधून दाखवा… आता तुमच्या नावावर करतो” : काळेंच्या आरोपांवर बागडेंचे आव्हान! 

दरम्यान, चांद्रयान-3 13जुलै रोजी प्रेक्षपीत झाल्यानंतर 23 ऑगस्टपर्यंत चंद्रावर पोहोचेल. चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुना गोळा करणे, भूकंपाच्या हालचालींवर लक्ष ठेवणं अशा अनेक गोष्टी अभ्यासल्या जाणार आहेत.

Tags

follow us