Chandrayaan-3 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो) एक दुःखद बातमी समोर आली आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञ एन. वलरमथी यांचे निधन झाले आहे. रविवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीहरिकोटा येथील रॉकेट प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनमध्ये एन. वलरमथी यांनी आपला आवाज दिला होता. देशाची तिसरी चंद्र मोहीम चांद्रयान-3 लाँच करण्यात आले होते तेव्हा हे काऊंटडाऊन झाले होते. चांद्रयान-3 चे 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण करण्यात आले होते.
प्रज्ञान रोव्हर निष्क्रिय
23 ऑगस्ट रोजी, चांद्रयान-3 चे लँडर मॉड्यूल (LM) चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले होते. यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांचा समावेश होता. असा पराक्रम गाजवणारा भारत चौथा देश ठरला. या लँडिंगमुळे चंद्राच्या अज्ञात दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत देश पहिला ठरला होता. दरम्यान, इस्रोने शनिवारी सांगितले की, चंद्रावरील प्रज्ञान रोव्हर निष्क्रिय करण्यात आले आहे. स्पेस एजन्सीला 14 दिवसांनंतर ते पुन्हा सक्रिय होण्याची आशा आहे.
पंकजा मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती परिक्रमा दौरा; असा असणार संपूर्ण दौरा
चंद्रावर प्रज्ञान रोव्हर कायम असेल
रोव्हर अल्फा पार्टिकल एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर (APXS) आणि लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्पेक्ट्रोस्कोप (LIBS) या दोन पेलोडसह सुसज्ज आहे. लँडरद्वारे पृथ्वीवर डेटा प्रसारित करणारे पेलोड्स बंद करण्यात आले आहेत.
मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची बैठक, मनोज जरांगेंना चर्चेसाठी निमंत्रण
प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर वैज्ञानिक डेटा गोळा करण्यासाठी एकत्र काम करत होते. APXS आणि LIBS पेलोड्स चंद्राची माती आणि खडकांच्या मूलभूत आणि खनिज रचनांचे विश्लेषण करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. जर प्रज्ञान रोव्हर “यशस्वीपणे सक्रिय झाले नाही, तर ते चंद्रावर भारताचे चंद्रदूत म्हणून कायमचे राहील.