बीएसएफ जवानांची बस दरीत कोसळली; चार जवान शहीद, 28 हून अधिक जण जखमी

बसमध्ये 35 जवान होते. हे जवान विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होते. त्याच दरम्यान ब्रेल गावाजवळ हा दुर्घटना घडली.

A Bus Carrying BSF Jawans

A Bus Carrying BSF Jawans

J & K Budgam Bus Accident: जम्मू-काश्मीरमधील बडगाव जिल्ह्यामध्ये बीएसएफ जवानाला (BSF) घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. यात चार जवानांचा मृत्यू झाला आहे. तर 28 हून अधिक जण जखमी झाले आहेत. बसमध्ये 35 जवान होते. हे जवान विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होते. त्याच दरम्यान ब्रेल गावाजवळ हा दुर्घटना घडली.

स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार जवान हे बसमधून विधानसभा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी जात होती. बसमध्ये 35 जवान प्रवास करत आहेत. ब्रिल गावापासून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. चालक बस नियंत्रित करत असताना खोलदरीत कोसळली. त्यात जवान गंभीर जखमी झाले. अपघाताचा आवाज एेकल्यानंतर आसपासचे गावातील लोक मदतीला आले. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी आले. पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना दरीतून बाहेर काढले असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील चार जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version