लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेट कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, पाठीचा कणाच फ्रॅक्चर केला, Video व्हायरल

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेट कर्मचाऱ्याला बेदम मारहाण, पाठीचा कणाच फ्रॅक्चर केला, Video व्हायरल

Army officer attacks SpiceJet employees : श्रीनगर विमानतळावर (Srinagar airport) एका लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय. स्पाइसजेटच्या निवेदनानुसार, ही घटना २६ जुलै रोजी घडली. हा घटनेत चार कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली.

‘महादेवी’ हत्तीणीसाठी कोल्हापूरकर एकवटले, पदयात्रेत हजारोंचा सहभाग; खासदारांनीही दिली आनंदाची बातमी 

जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये प्रवेश
सविस्तर वृत्त असं की, २६ जुलै २०२५ रोजी श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या फ्लाइट SG-386 च्या बोर्डिंग गेटजवर एका प्रवाशाने स्पाइसजेटच्या चार कर्मचाऱ्यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारहाण केली. हा प्रवासी लष्करी अधिकारी असल्याची माहिती आहे. या लष्करी अधिकाऱ्याकडे १६ किलो वजनाचे सामान होते. मात्र, देशांतर्गत उड्डाणांमध्ये, ७ किलो वजनापेक्षा जास्त केबिन लगेज घेऊन जाऊ शकत नाही, असं स्पाइसजेट कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याला सांगितलं. मात्र, लष्करी अधिकाऱ्याने सामानाचे अतिरिक्त पैसे देण्यास नकार दिला आणि बोर्डिंग प्रक्रिया पूर्ण न करता जबरदस्तीने एअरोब्रिजमध्ये प्रवेश केला.

सनातन धर्म नसता तर आव्हाड जित्तुद्दीन झाले असते; वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे गट संतापला… 

हे विमान सुरक्षा नियमांचे उल्लंघन आहे. कर्मचाऱ्यांनी लष्करी अधिकाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याने जवळच ठेवलेल्या स्टँड आणि लाथा-बुक्क्यांनी कर्मचाऱ्यावर हल्ला केला, असं एअरलाईनने म्हटलं. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

कर्मचाऱ्याचा पाठीचा कणा फ्रॅक्चर
एअरलाइनने म्हटले आहे की, लष्करी अधिकाऱ्याने स्पाइसजेटच्या चार जणांचवर हल्ला केला. आमच्या कर्मचाऱ्यांना वारंवार लाथा आणि ठोसे मारण्यात आले. त्यामुळं एका कर्मचाऱ्यांच्या पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली. तर स्पाइसजेटचा अन्य एक कर्मचारी जमिनीवर बेशुद्ध पडला, अधिकारी बेशुद्ध होईपर्यंत कर्मचाऱ्याला लाथा मारत राहिला, असं एअरलाइनने सांगितलं.

दरम्यान, एअरलाइनने म्हटले आहे की, जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तसेच लष्करी अधिकाऱ्याची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. लष्करी अधिकाऱ्याला नो-फ्लाय लिस्टमध्ये टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube