Jagdeep Dhankhar : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. धनखड यांनी राजीनामा का दिला याबाबत आता अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. केंद्र सरकारवर विरोधक टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा दिला असं जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. धनखड यांचा कार्यकाळ 11 ऑगस्ट 2027 रोजी संपणार होता मात्र त्यांनी यापूर्वीच राजीनामा दिल्याने त्यांना भारत सरकारकडून काय सुविधा मिळणार याबाबत सोशल मीडियावर जोरात चर्चा होताना दिसत आहे.
राजीनामा दिल्यास पेन्शन मिळते का?
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संविधान कलम 67 अ नुसार राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर देखील त्यांना पेन्शन आणि सरकारकडून मिळणारे इतर अनेक सुविधा मिळणार आहे. सरकारकडून 2018 च्या अर्थसंकल्पात उपराष्ट्रपतींचा पगार दरमहा 4 लाख रुपये निश्चित करण्यात आला होता. त्यामुळे धनखड यांना या पगारानुसार पेन्शन मिळणार आहे.
एका वृत्तानुसार माजी उपराष्ट्रपतींना त्यांच्या पगाराच्या 50 ते 60 टक्के पेन्शन म्हणून मिळते. या वृत्तानुसार राजीनामा दिल्यानंतर जगदीप धनखड यांना पेन्शन म्हणून 2 लाखांपेक्षा जास्त पेन्शन मिळू शकते. नियमानुसार, जर उपराष्ट्रपती त्यांच्या पदावर दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त काळ राहिले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला तर त्यांना पेन्शन आणि निवृत्तीशी संबंधित सुविधा मिळणार. मात्र उपराष्ट्रपती यांनी दोन वर्षांपूर्वी राजीनामा दिला तर त्यांना त्याच प्रमाणात पेन्शन देण्यात येते.
पेन्शनसह ‘या’ सविधाही मिळणार
नियमांनुसार, दोन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी पदावर राहिल्यानंतर राजीनामा दिल्यानंतर किंवा निवृत्ती घेतल्यानंतर माजी उपराष्ट्रपतींना अनेक सुविधा मिळत राहतात. त्यांना टाइप VIII सरकारी बंगला, मोफत रेल्वे आणि विमान प्रवास आणि खाजगी डॉक्टरची सुविधासह मोफत उपचार मिळतो. याच बरोबर माजी उपराष्ट्रपतींच्या कुटुंबाला सरकारी रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा देखील जाते.
घोटाळ्याची फाईल ते अत्याचाराचे प्रकरण…, ठाकरेंचा पदाधिकारी अडचणीत
पद सोडल्यानंतरही, उपराष्ट्रपतींना दोन पीए दिले जातात. माजी उपराष्ट्रपतींच्या पती/पत्नीला खाजगी सचिव देखील मिळतो. माजी उपराष्ट्रपतींना दिलेल्या बंगल्यात मोफत पाणी आणि वीज असते. याशिवाय फर्निचर आणि इतर उपकरणांची सुविधा देखील उपलब्ध आहे. त्यांना दोन मोफत कॉलिंग फोनची सुविधा देखील मिळते.