Download App

गाड्या उडवल्या… 9 जणांना चिरडले, मद्यधुंद चालकाचा ‘कार’नामा; जयपूरमध्ये हिट अॅण्ड रन

Drunk Car Driver crushes 9 people Jaipur accident : मद्यधुंद कार चालकाने 9 जणांना चिरडल्याची घटना जयपूरमध्ये (Jaipur) घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या चालकाने दुचाकी अन् इतर गाड्यांना धडक देत नऊ जणांना (Hit And Run Case) चिरडले. या अपघातात (Accident) तिघांचा मृत्यू तर सहा जण जखमी झालेत. गाडी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर तब्बल चालकाने सात किलोमीटर प्रवास केला. यामुळं मोठं नुकसान झालंय.

राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये काल रात्री उशिरा एक मोठा अपघात घडला. सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास, नाहरगड पोलीस स्टेशनच्या समोरून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या जयपूर परकोटा (Jaipur Hit And Run) येथे एका भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अंतरादरम्यान, कारने धडक दिल्याने 9 जण जखमी झाले, त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. गाडी चालक त्याच्या मार्गात येणाऱ्यांना धडक देत होता. यामुळे बाजारात गोंधळ निर्माण झाला. नंतर, जेव्हा कार चालक गाडी सोडून पळून जाऊ लागला तेव्हा लोकांनी त्याला पकडले.

शेअर बाजार सावरला! सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची तेजी, निफ्टीचीही घोडदौड

या प्रकरणात डीसीपी राशी डोगरा डड्डी यांनी सांगितले की, शास्त्री नगर येथील रहिवासी कार चालक उस्मान खानला अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हर दारू पिलेला होता. ड्रायव्हर पकडल्याची बातमी कळताच लोक शांत झाले. आरोपी चालक उस्मान खानचा विश्वकर्मा येथे लोखंडाचा कारखाना असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कार चालकाने प्रथम नाहरगड पोलिस स्टेशन चौकात स्कूटर आणि पादचाऱ्याला धडक दिली.

यानंतर त्याने गाडी संतोषी माता मंदिराकडे वळवली. तिथे एका दुचाकीला आणि एका पादचाऱ्याला धडक बसली. मग थोडे पुढे गेल्यावर त्याने एका व्यक्तीला धडक दिली आणि गाडी सोडून पळून गेला. गाडीने दोन जणांना चिरडले आणि रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ते पाहून जमाव अधिकच संतप्त झाला होता.

“तो फोन आला अन् पुढे..” आयुक्त मनोहरेंच्या नातेवाईकांचा दावा; पोलिसांच्या पंचनाम्यात काय?

जयपूर उत्तर अतिरिक्त डीसीपी बजरंग सिंह शेखावत यांनी सांगितले की, कार चालकाने एमआय रोडवर काही वाहनांना धडक दिली होती. पळून जाताना त्याने नाहरगड पोलीस स्टेशन परिसरातील लंगरच्या बालाजी वळणाजवळ तीन ठिकाणी अपघात केले. परंतु, लोकांनी त्याला पकडले. या अपघातात 50 वर्षीय ममता कंवर, 37 वर्षीय अवधेश पारीक आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान, उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहेत. कार चालकाला ताब्यात घेण्यासोबतच कारही जप्त करण्यात आली आहे.

 

follow us