Worli Hit And Run प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; मी मुख्यमंत्री असेपर्यंत…

Worli Hit And Run प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा; मी मुख्यमंत्री असेपर्यंत…

CM Shinde strict warning for Worli Hit And Run : पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे भीषण अपघात झाला. (Worli Hit And Run Case) यामध्ये वरळी पोलिसांनी आरोपीचे वडिल आणि शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा (Rajesh Shah) आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) यांनी मी या राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. असं म्हणत कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट केले आहे.

Exclusive: देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार? शरद पवारांना तर तसंच वाटतंय..

या ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, महाराष्ट्रात वारंवार हीट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मी अत्यंत चिंतेत आहे. धनदांडग्या आणि राजकारणी लोकांकडून पदाचा गैरवापर केला जात आहे. मात्र माझं सरकार हे सहन करणार नाही. सर्वसामान्यांचा जीव आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे हीट अँड रनची प्रकरण गांभीर्याने हाताळण्यात यावी पिडीतांना न्याय मिळावा. यासाठी मी पोलिसांना निर्देश दिले आहेत. त्याची कठोर अंमलबजावणी देखील सुरू आहे.

तसेच मी या राज्याचा मुख्यमंत्री असेपर्यंत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. मग ते श्रीमंत असो मंत्र्यांची मुलं असो किंवा कोणत्याही पक्षाशी संबंधित असो. माझे सरकार पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. तसेच सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी ग्वाही देखील दिली आहे.

नेमकी घटना काय?

वरळीत रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजता एक कोळी दाम्पत्य मासे आणण्यासाठी बाहेर पडलं होतं. त्यावेळी वरळीतील अॅट्रीया मॉल जवळ त्यांना मासे घेऊन परतत असताना एका फोरव्हिलरने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेमुळं ते दोघेही कारच्या बोनटवर पडले. वेळीच नवऱ्याने बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला बाजूला होता आलं नाही. तर अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. यात त्या महिलेचा मृत्यू झाला.

ब्रेकिंग! जम्मू काश्मीरात लष्करी वाहनावर दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला

या अपघातात कार चालक पळून गेला होता. कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी वरळी पोलिसांनी तपासादरम्यान शिवसेनेच्या शिंदे गटातील उपनेते राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिदावत यांना अटक केली आहे. राजेश शाह हे आरोपी मिहिर शाहचे वडील आहेत. मिहीर हा अपघात प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तो अद्याप फरार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube