CM Shinde यांच्याकडून प्रचारसभे दरम्यान ज्येष्ठ कलावंत विलासराव रकटेंना मदतीचा हात…

CM Shinde यांच्याकडून प्रचारसभे दरम्यान ज्येष्ठ कलावंत विलासराव रकटेंना मदतीचा हात…

CM Shinde help to Senior Actor vilasrao Rakate : सध्या लोकसभा निवडणुकांचा ( Lok Sabha Election ) जोरदार प्रचार सुरू आहे. त्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shinde ) यांनी ज्येष्ठ कलावंत विलासराव रकटेंना ( vilasrao Rakate ) मदतीचा हात दिला आहे.

भाजपने उमेदवारी दिलेले उज्ज्वल निकम कसाबच्या बिर्याणीवरून ट्रोल; नेमकं प्रकरण काय?

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगली जिल्ह्यातील कामेरी या गावी गेले होते. यावेळी शिंदे यांना प्रचारसभा सुरू असताना स्थानिकांनी या गावात राहणारे ज्येष्ठ सिनेकलावंत विलासराव रकटे हे अत्यंत हालाखीत जीवन जगत असल्याचे सांगितले. त्यावर शिंदे यांनी तात्काळ याची दखल घेतली.

एटीएस अन् तटरक्षक दलाची मोठी कारवाई; गुजरातेत ड्रग्ज साठ्यासह 14 पाकिस्तानींना अटक

रकटे यांनी आपल्या कारकिर्दीत 100 हुन अधिक मराठी सिनेमांमध्ये चरित्र भूमिका साकारल्या आहेत. मात्र तरीही पडत्या काळात त्यांच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांना समजले. त्यांनी तत्काळ या गोष्टीची दखल घेऊन त्यांना सन्मानाने सभास्थळी बोलावले. त्यानंतर वैयक्तिकरित्या त्यांना 5 लाख रुपये मदत म्हणून देत असल्याचे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या मदतीबद्दल सभेनंतर रकटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube