एटीएस अन् तटरक्षक दलाची मोठी कारवाई; गुजरातेत ड्रग्ज साठ्यासह 14 पाकिस्तानींना अटक
ATS and Coast Guard action 14 Pakistani Arrested in Gujrat Drugs : गुजरात किनारपट्टीवर पुन्हा एकदा मोठा ड्रग्ज साठा ( Gujrat Drugs ) जप्त करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, गुजरात दहशतवाद विरोधी पथक ( ATS ) आणि भारतीय तटरक्षक दलाने ( Coast Guard ) ही संयुक्त कारवाई केली आहे.
Horoscope Today: धनु राशीच्या लोकांचा आजचा दिवस लाभाचा, जाणून घ्या राशीभविष्य
यामध्ये गुजरात किनारपट्टीवर 86 किलो ड्रग्ज साठ्यासह 14 पाकिस्तानी नागरिकांना अटक ( 14 Pakistani Arrested ) करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 600 कोटी एवढी आहे. गुजरात एटीएस आणि तटरक्षक दराने भर समुद्रात रात्रभर कारवाई करत हा ड्रग्ज साठा वाहून येणारी पाकिस्तानी बोट पकडली आहे.
मोहितेंकडून एक-एक रुपयाचा हिशेब घेणार, निंबाळकर कोणाच्या बापाला घाबरत नाही; निंबाळकरांचे चॅलेंज
मात्र यामध्ये कोणत्या प्रकारचा अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याबाबत तटरक्षक दलाकडून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. ही कारवाई करताना संशयित जहाज ओळखण्यासाठी आयसीजी जहाज राजरतनचा वापर करण्यात आला होता. तसेच हा ड्रग्ज साठा आणि 14 पाकिस्तानींना अटक केल्यानंतर पोरबंदर येथे आणण्यात आले आहे.
याअगोदर देखील गुजरातमध्ये कच्छ जिल्ह्यामध्ये पोलिसांनी 800 कोटींच्या ड्रग्जवर (Gujarat Drugs) मोठी कारवाई केली होती. जिल्ह्यातील गांधीधाम येथे कोट्यावधी रूपायांची बेकायदेशीर औषधे सापडली होती. ही औषधे समुद्र किनाऱ्यावर टाकून देण्यात आले होते. ही तब्बल 80 पाकीटं सापडली होती. त्याचे प्रत्येकी वजन सुमारे 1 किलो होतं. या औषधं प्रकरणी पोलिसांना संशय होता. मात्र काईवाई होण्याच्या भीतीने या तस्करांनी हे अंमली पदार्थ समुद्र किनारी टाकून दिले होते.