भिवंडीत बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्या तिघांना अटक; ATS ची मोठी कारवाई

  • Written By: Published:
भिवंडीत बांगलादेशी नागरिकांसाठी बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्या तिघांना अटक; ATS ची मोठी कारवाई

ATS arrested People : राज्य गुप्तचर यंत्रणेच्या सर्वेक्षणातून काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली होती. मागील काही वर्षात पुण्या-मुंबईत हजारो बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत आहे. बांगलादेशींवर कारवाई होत नसल्यानं घुसखोरांचं फोफावत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, आता महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (Maharashtra Anti Terrorism Squad) ठाणे जिल्ह्यातील भिवंडी (Bhivandi) शहरात बनावट शिधापत्रिका बनवणाऱ्या ३ आरोपींना अटक केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=3UoWv9XTJzE

देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बांगलादेशी नागरिकांनी भारतात येण्यासाठी आवश्यक पासपोर्ट आणि परवाने तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, या सर्व सरकारी नियमांना बगल देऊन अनेक बांगलादेशी दलालांच्या मध्यस्थीने छुप्या आणि बेकायदेशीरपणे भारतात येतात. आणि या दलालांच्या मदतीने ते भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात राहतात. मात्र, आता बनावट रेशनकार्ड बनवून देणाऱ्या तिन जणांच्या टोळीला एटीएसने बेड्या ठोकल्या आहे. भिवंडी शहरातील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महाराष्ट्र एटीएसने ही कारवाई केली आहे. इरफान अली अन्सारी, संजय बोध आणि नौशाद राय अहमद शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

‘विरोधात बोलल्याचं जिवंत उदाहारण म्हणजे ‘माध्यमांवर बंदी’; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका 

याप्रकरणी निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक पोलिस करत आहेत. देशात बांगलादेशी नागरिकांची घुसखोरी वाढत आहे. मुंबईच्या आसपासच्या भागात बांगलादेशी नागरिकांची दहशत वाढली आहे.

हे नागरिक बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत आहेच शिवा्य ते सरकारी योजनांचा लाभही घेत आहेत. अशा प्रकारे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांसाठी बनावट शिधापत्रिका बनवली जात असल्याची माहिती एटीएस अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानंतर महाराष्ट्र एटीएसच्या ठाणे युनिटने सापळा रचून ३ जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये नौशाद हा रेशन दुकान चालवतो. तर इतर दोघांवर बनावट कागदपत्रे बनवल्याचा आरोप आहे.

हे तिघे बांगलादेशी नागरिकांसाठी रेशनकार्ड मिळवून देत होते. एटीएसला मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशी नागरिकांसाठी भारतीय कागदपत्रे मिळवण्यासाठी लोकांकडून पैसे घेत होते. बनावट शिधापत्रिका बनवण्यासाठी ते आठ हजार रुपये घेत होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube