‘विरोधात बोलल्याचं जिवंत उदाहारण म्हणजे ‘माध्यमांवर बंदी’; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

‘विरोधात बोलल्याचं जिवंत उदाहारण म्हणजे ‘माध्यमांवर बंदी’; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका

Supriya Sule : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलल्याचं जिवंत उदाहरण म्हणजे माध्यमांवर बंदी घालणं असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केली आहे. बारामतीत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करीत केंद्र सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

पंकजा मुंडेंना मोठा धक्का, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटीचा छापा, 19 कोटींची मालमत्ता जप्त

सुप्रिया सुळे(Supriya Sule ) म्हणाल्या, केंद्र सरकार किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले तर काहीतरी कटकारस्थान ते करतातच, सत्तेचा गैरवापर कसा करायचा असतो आणि दडपशाही कशी वाढवायची याचे आणखी एक जिवंत उदाहरण म्हणजे एका चँनेलवर बंदी आणणे होय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने रचली सर्वोच्च धावसंख्या; सूर्याची तुफानी इनिंग, गिल-अय्यरची शतकं

सध्या अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी ऊत आला आहे. त्यावर बोलताना सुळे म्हणाल्या, आमच्याकडून तरी लोकशाही आहे, आता दिल्लीत काय दडपशाही चालते हे संपूर्ण देश पाहतो, पण आमच्याकडून लोकशाहीच आहे.

Rohit Pawar : ‘आता अजितदादांनीच उत्तर द्यावं’; शहांच्या दौऱ्यावरून रोहित पवारांचं थेट चॅलेंज !

मला अस वाटतं की कोणीतरी माझ्या विरोधात लढणारच आहे, आपण सर्वांनीच या गोष्टीचा मानसन्मान करायला हवा, तीन वेळा भाजप माझ्याविरोधात लढला आहे, याही वेळेस कोणीतरी लढणारच, लोकशाहीचे मी मनापासून स्वागत करते, ही लोकशाही जगली टिकली पाहिजे, त्यामुळे सर्वांनीच अशा निर्णयाचे पूर्ण ताकदीने स्वागत करायला हवे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

संसदेच्या अधिवेशनात आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा :
राज्यात धनगर, मराठा, लिंगायत, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे. संसदेचं विशेष अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात किमान एक दिवस तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे होती, देशात महागाई, बेरोजगारी अशा मुद्द्यांवर चर्चा झालीच नाही,. पाच दिवसांच अधिवेशन चारच दिवसांत गुंडाळलं ही दुर्देवी बाब असून सत्ताधाऱ्यांनी स्वार्थासाठी जुमलेबाजी केली, लोकांच्या पदरात या अधिवेशनातून काहीही पडलेले नसल्याचंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube