राजा शिवाजीच्या प्रमोशनसाठी युवा सेनेचा मदतीचा हात! राज्यभरात विविध ठिकाणी मोफत शो रंगणार

Raja Shivaji च्या प्रमोशनसाठी युवा सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे आता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाचे मोफत शो रंगणार आहेत.

Raja Shivaji

Yuva Sena help for promotion of Raja Shivaji Free shows will at various places across the state : ‘जिओ स्टुडिओज’ आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ प्रस्तुत बहुप्रतिक्षित ऐतिहासिक महाचित्रपट ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनाची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, दमदार कलाकारांची फळी आणि भव्य निर्मितीमूल्यांमुळे ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट यंदाच्या वर्षातील सर्वात चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. आता या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी युवा सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे आता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत शो रंगणार आहेत.

राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी मोफत शो रंगणार…

राजा शिवाजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी युवा सेनेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे आता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत शो रंगणार आहेत. शिवसेनेच्या युवासेनेकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये घोषणा केल्याप्रमाणे मुंबई , अमरावती, अकोला, बुलढाणा, मुंबई उपनगर, वाशिम, यवतमाळ, ठाणे, नागपूर, वर्धा, भंडारा, रायगड, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, पुणे, गडचिरोली, पिंपरी-चिंचवड, बीड, सातारा, लातूर, सांगली, धाराशिव, कोल्हापूर, नांदेड, सोलापूर, परभणी, अहिल्यानगर, हिंगोली, धुळे, जालना, नंदुरबार, जळगाव याशहरांमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

गोंधळ’नंतर संतोष डावखरांची नवी ऐतिहासिक कलाकृती! महाराष्ट्र दिनी ‘शहाजीराजे’ची दमदार घोषणा

‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट ज्योती देशपांडे आणि जिनिलीया देशमुख यांच्या निर्मितीत साकारला असून, 1 मे 2026 रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट भारतीय इतिहासाला केवळ पुनर्प्रस्तुत करत नाही, तर त्याला आधुनिक सिनेमॅटिक भाषेत नव्याने जिवंत करण्याचा प्रयत्न करतो.

Congress : उमेदवार देण्याच्या वल्गना अन् ऐनवेळी बॅकफूटवर; काँग्रेसचा ‘पंजा’ नेमका कुणाच्या दबावात?

या चित्रपटाचे संगीत ‘वॉर्नर म्युझिक इंडिया’ आणि ‘देश म्युझिक’ यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले आहे. ‘जय शिवराय’ या गाण्याच्या प्रदर्शनानंतर डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळताना दिसत असून, हे गीत आता सर्व प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे. इतिहास, संगीत आणि भावनांचा संगम साधणारे हे गीत चित्रपटाच्या अपेक्षांना अधिक उंचीवर घेऊन जात आहे.

follow us