… म्हणून निर्मित सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची मदत घेतली
Super Duper film मध्ये मी एका गावाकडच्या बाईची भूमिका साकारतेय. यासाठी मी मकरंद अनासपुरेशी संपर्क साधला.
Nirmiti Sawant take help of Makrand Anaspure for Super Duper film : मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत या पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या तोंडी असलेला रांगडा लहेजा, संवादफेक आणि अस्सल गावाकडचा अंदाज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून सुटका हवी? ‘हे’ घरगुती उपाय करून बघा!
या चित्रपटात त्या गावातील एका खंबीर बाईची भूमिका साकारत आहेत. ट्रेलरमध्येच त्यांच्या व्यक्तिरेखेची झलक पाहायला मिळते. घर सांभाळणारी, परिस्थितीशी झुंज देणारी आणि कुटुंबाच्या अस्तित्वासाठी उभी राहाणारी स्त्री. विशेष म्हणजे, या भूमिकेला अधिक वास्तववादी बनवण्यासाठी निर्मिती सावंत यांनी खास मेहनत घेतली आहे.
पुण्याहून बीडला चोरीसाठी गेले, टॉवरवर चढताच तोल गेला, दोघांचा मृत्यू
ग्रामीण भाषेचा नेमका फ्लेवर, रांगडेपणा आणि बोलीभाषेतील बारकावे अचूक साधण्यासाठी त्यांनी मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक खास शैली निर्माण करणाऱ्या अभिनेता मकरंद अनासपुरे यांची मदत घेतली. त्यांनी स्क्रिप्ट पाठवून त्यांच्याकडून भाषेतील शब्द, वाक्प्रचार आणि लहेजा समजून घेतला, ज्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेला खरेपणाची जोड मिळाली.
प्राजक्त तनपुरे ना घर के ना घाट के ? राष्ट्रवादीविरोधात भूमिका नडणार
याबद्दल निर्मिती सावंत म्हणतात, ” ट्रेलरमध्ये दिसतंच आहे की, मी एका गावाकडच्या बाईची भूमिका साकारतेय. तिचं आयुष्य, तिचं जगणं हे खूप वास्तव आहे.भाषेचा आणि लहेजाचा अचूकपणा यासाठी मी मकरंद अनासपुरेशी संपर्क साधला. अर्थात दिग्दर्शकाच्या परवानगीने. मकरंद त्याच भागातला असल्यामुळे, त्याच्या मार्गदर्शनामुळे त्या बोलीचा रांगडेपणा आणि नैसर्गिकपणा मला समजला. तिथले काही शब्द कसे वापरले जातात , हे कळले. त्यामुळे ही भूमिका अधिक खरी वाटते. अशीच जर मी ती भूमिका साकारली असती तर ‘माझ्या आणखी एक भूमिकेपैकीच’ ती राहिली असती, मात्र आता ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असं मला वाटतं.”
शरद पोंक्षेंच्या भाषणाने खळबळ; संघ हवे तर दहा भाजप उभा करू शकतो, भाजपच्या भविष्यासंदर्भात मोठं विधान
चित्रपट निवडण्याबाबतही त्या अत्यंत विचारपूर्वक निर्णय घेतात. स्क्रिप्ट वाचताना त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाल्यानंतरच त्या भूमिका स्वीकारतात. प्रॉडक्शन हाऊस, दिग्दर्शक, लेखक, डीओपी अशा सर्व गोष्टींचा बारकाईने विचार करूनच त्या चित्रपटाची निवड करतात. नव्या कलाकारांमध्येही ‘स्पार्क’ दिसला, तर त्यांच्यासोबत काम करण्यास त्या नेहमी तयार असतात. नवीन वर्षात विविध सुपरहिट चित्रपटांमधून वेगवेगळ्या, लक्षवेधी भूमिका साकारत निर्मिती सावंत यांनी आपली अभिनयाची छाप अधिक गडद केली आहे. ‘सुपर डुपर’मधील त्यांची ही ग्रामीण भूमिका देखील प्रेक्षकांच्या मनात घर करेल, यात शंका नाही.
एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत; जमीन गैरव्यवहार प्रकरणात फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल
झी स्टुडिओजची प्रस्तुत, नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स निर्मित ‘सुपर डुपर’ हा कौटुंबिक मनोरंजनाचा महासोहळा येत्या ३ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर‘ या चित्रपटाचे विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते आहेत. उमेश कुमार बन्सल, बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ता असून छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.