देशात नथुराम अन् तुकारामांची लढाई, पण गडकरी आमच्या मनातलं… आव्हाड नेमकं काय म्हणाले?

देशात नथुराम अन् तुकारामांची लढाई, पण गडकरी आमच्या मनातलं… आव्हाड नेमकं काय म्हणाले?

Jetendra Awhad on Nitin Gadkari and Attack On Mahatma Gandhi Statue in pune : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार घडला. त्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली. तसेच त्यांनी यावेळी नितीन गडकरींच्या तिसऱ्या महायुद्धापबाबतच्या वक्तव्यावर देखील आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरामध्ये आव्हाडांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी पुण्यातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर वार करण्यात आलेल्या घटनेवर म्हटलं की, ही मानसिक विकृती आहे. देशात लढाई नथुराम आणि तुकाराम यांच्या विचारांची आहे. जगाला काय संदेश देत आहोत. तीन गोळ्या झेलतानाही शेवटी हे राम म्हंटलं होतं. त्या व्यक्तीवर कारवाई होणार नाही. पण अजून 10 जणं तयार होणार.

‘तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं,’ नितीन गडकरींनी दिला मोठा इशारा…

त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी केंद्रिय मंत्री गडकरींच्या विधानावर म्हटलं की, जगामध्ये शांतता, प्रेम आणि सुसंवाद कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं. असं गडकी म्हणाले. तसेच ते हे पण बोलले. सत्ता आणि आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण झाले पाहिजे. हेच आम्ही देखील म्हणतोय. गडकरी सत्य बोलतात आणि आम्हाला ते आवडतात. आमच्या मनात असतं ते गडकरी बोलतात.

नेमकं प्रकरण काय?

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडल्याची (Pune Crime) माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक प्रवासी होते. यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन आला, त्याने केशरी रंगाचा कुर्ता घातलेला होता. तो महात्मा गांधींचा पुतळा असलेल्या चौथऱ्यावर चढला अन् त्याने पुतळ्यावर (Mahatma Gandhi Statue) कोयत्याने वार केले.

महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला, रोहिणी खडसे संतापल्या…

प्रवाशांनी हा प्रकार पाहिला. त्यानंतर तेथे रेल्वे पोलिसांना बोलविण्यात आलं. रेल्वे पोलिसांनी तातडीने सुरज शुक्ला याला चौथऱ्यावरुन खाली उतरवत ताब्यात घेतलं. सुरज शुक्लाने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या छातीवर अन् पायाने कोयत्याने (Attack On Mahatma Gandhi Statue) वार केले होते. गांधींच्या पुतळ्याचे डोकं त्याला कोयत्यानं तोडायचं होतं. परंतु, त्याआधीच रेल्वे पोलिसांनी सुरजला ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असं सांगितलं जातंय.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube