‘तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं,’ नितीन गडकरींनी दिला मोठा इशारा…

Nitin Gadkari Statement On Third World War : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी जागतिक युद्धासंदर्भात एक मोठं विधान (Third World War) केलंय. जगामध्ये शांतता, प्रेम आणि सुसंवाद कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं, असा इशारा गडकरींनी दिलाय. यामागे काही महासत्तांची हुकूमशाही हे कारण (Nagpur) असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
तिसरं महायुद्ध कधीही
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 6 जुलै रोजी नागपुरातील ‘बियॉन्ड बॉर्डर्स’ नावाच्या एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमा बोलत होते. भारत भगवान बुद्धांची भूमी असून ती सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश देते. त्यामुळे जगात घडणाऱ्या घटनांकडे बघून आपण भविष्यातील धोरणांचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. तिसरं महायुद्ध कधीही सुरू होवू शकतं, अशी परिस्थिती युद्धांमुळे निर्माण झाली असल्याचं त्यांनी म्हटलंय.
महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला, रोहिणी खडसे संतापल्या…
युद्धं तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत
आजची युद्धं तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत झालं असल्यामुळं मानवतेचं रक्षण करणं कठीण होतंय. टँक आणि लढाऊ विमानांसारख्या शस्त्रांचं महत्त्व खूपच कमी झालंय. आता क्षेपणास्त्रे आणि ड्रोनसारख्या शस्त्रांचा वापर जास्त होतोय. आता मानवी वस्त्यांवर देखील क्षेपणास्त्रे टाकली जात आहेत, अशा काळामध्ये परिस्थिती अतिशय कठीण होत चालली आहे.
‘आपल्या घरात कुत्राही वाघ…’ भाजप खासदाराचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र
महासत्तांची हुकूमशाही अन् राजवट
आपण सर्वजण विनाशाकडे वाटचाल करीत आहोत. महासत्तांच्या हुकूमशाही अन् राजवटीमुळं जगात संवाद संपत चालला आहे. जगभरात या मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे. यासाठी वेळेवर पावले उचलण्याची गरज असल्याचं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. तर भारत देशामध्ये संपत्तीचं विकेंद्रीकरण करणं आवश्यक असल्याचं देखील नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे. देशात गरीबी वाढत चालली असून काही श्रीमंतांच्या हातात संपत्ती वाढत चालली आहे. अर्थव्यवस्थेचं केंद्रीकरण होता कामा नये, असं देखील गडकरींनी स्पष्ट केलंय.