नागपुरात दहीहंडीला डीजेचा दणदणाट; नितीन गडकरींची उपस्थिती, डेसिबल तपासण्यासाठी पोलिस घटनास्थळी

DJ and Laser Lights Used at Dahi Handi पोलिसांचे आदेश झुगारुन बडकस चौकात दहीहंडीच्या कार्यक्रमाला डीजे, लेझर लाईट लावण्यात आला.

DJ and Laser Lights

DJ and Laser Lights Used at Dahi Handi Celebration in Nagpur: नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी डीजेवर बंदी लावली असतानाच तेथे दहीहंडीच्या उत्सावाला डीजे लावण्यात आला. पोलिसांचे आदेश झुगारुन बडकस चौकात दहीहंडीच्या कार्यक्रमाला डीजे, लेझर लाईट लावण्यात आला. इतकेच नाही तर, या दहीहंडीच्या कार्यक्रमाला चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

‘ओबीसींच्या नावावर त्यांनी सगळं खाल्लं, महाराष्ट्र सदनही सोडलं नाही’; जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप

बडकस चौक मित्र परिवाराकडून दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आयोजकांनी डीजे सुरू करण्याची भूमिका आधीपासूनच स्पष्ट केली होती. पोलिसांकडून नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतरही डीजेचा वापर करण्यात आला. कार्यक्रमस्थळी लेझर आणि तीव्र प्रकाशाच्या लाईट्सचाही वापर झाल्याचे दिसून आले.

पोलिस उपायुक्तांकडून घटनास्थळी पाहणी

दहीहंडी कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलिस उपायुक्तांनी बडकस चौकात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. नियमांचे उल्लंघन झाल्यास डीजे तत्काळ बंद करण्याची कारवाई केली जाईल, असे पोलिसांकडून आयोजकांना स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी पोलिसांची उपस्थिती कायम होती आणि ध्वनीची पातळीही तपासली जात होती.

16 तासांहून अधिक काम, मोबदला मात्र शून्य; विनावेतन कामात भारत जगात नंबर 1

दरम्यान, आयोजकांकडून डीजे सुरू ठेवण्याची भूमिका घेण्यात आली. मात्र, पोलिसांनी निर्धारित नियम आणि ध्वनीमर्यादा ओलांडल्याचे आढळल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला. त्यामुळे उत्सवाचा कार्यक्रम आणि पोलिसांचे निर्बंध यावरून वातावरण काहीसे तणावपूर्ण झाले.

आवाज तुलनेने कमी, पण डीजे सुरूच

बडकस चौकात दहीहंडी उत्सव सुरू झाल्यानंतर डीजेचा वापर करण्यात आला. नेहमीच्या तुलनेत आवाजाची तीव्रता कमी ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले असले, तरी डीजेचा आवाज परिसरात ऐकू येत होता. यासोबतच कार्यक्रमस्थळी लेझर लाईट आणि इतर तीव्र प्रकाशयोजनाही करण्यात आली होती.

सोनिया गांधींच्या ‘Belonging: A Journey of Love’ आत्मचरित्र 10 नोव्हेंबरला प्रकाशित होणार; नवा प्रकाशक कोण ?

गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्यासाठी मानवी मनोरे रचत उत्सवात सहभाग घेतला. दुसरीकडे, पोलिसांकडून कार्यक्रमस्थळी ध्वनीची पातळी मोजली जात होती. संध्याकाळी सातच्या सुमारास सुमारे 80 ते 82 डेसिबल इतकी ध्वनीपातळी नोंदवल्याचे सांगण्यात आले.

follow us