ज्याची भीती होती तेच घडलं! CPEC प्रोजेक्ट थेट अफगाणिस्तानात नेणार ड्रॅगन, भारताला धोक्याची घंटा

CPEC project will take China directly to Afghanistan warning for India : मागील काही वर्षांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. आता ऑपरेशन सिंदूरनंतर (Operation Sindoor) दोन्ही देशांत आणखी कटुता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानात तालिबान सरकार असतानाही भारत आणि अफगाणिस्तान (India Afghanistan) संबंध नव्याने आकार घेत आहेत.
विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद का मिळाला नाही? …मनोज जरांगेंनी आत्मचिंतन करावं, लक्ष्मण हाकेंचा सल्ला
अशातच आता चीन नवीन डाव खेळला आहे. चीनने पाकिस्तान आणि तालिबानशी आपसातील संबंध वाढवण्यासाठी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॅरिडॉर (CPEC) अफगानिस्तानपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.बिजिंगमध्ये झालेल्या पाकिस्तान आणि अफगानिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॅरिडॉर(CPEC) अफगानिस्तानपर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.
पाण्याचा थेंब किती दूषित? जिल्ह्यातील दीड हजार गावांत पाणी तपासणी; FTK देणार झटपट रिपोर्ट
यावेळी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार,चीनी परराष्ट्र मंत्री वांग यी आणि अफगानचे कार्यवाहू परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी आप-आपल्या देशांमध्ये व्यापार आणि विकासाला चालना देण्यावर चर्चा केली. त्यानंतर इशाक डार सोशल मिडीयावर पोस्ट केली. ज्यामध्ये ते म्हणाले की, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि चीन शांती, स्थिरता आणि विकासासाठी एकत्र आले आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने सर्व विक्रम मोडले, जगभरात मिळाले 65.3 अब्ज लाईव्ह व्ह्यूज
दरम्यान भारताने चीन अफगान पर्यंत विस्तार करणार असलेल्या या कॅरिडॉरचा विरोध केला होता. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी गेल्या वर्षी म्हटलं होतं की, CPEC चा भाग होणारे देश जम्मू-कश्मीरमध्ये भारताच्या भू-भागाचं उल्लंघन करतील. मात्र चीनला आपला हा प्लॅन यशस्वी करायचा असल्याने चीनला ही चिंता आहे की, भारत आणि अफगानिस्तानमधील संबंध सुधारत आहेत. कारण नुकतच अफगानने चाबहार पोर्टमध्ये रूचि दाखवली आहे. भारत आणि इरानने या पोर्टचा विकास केला आहे. त्यामुळे चीनने आपल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॅरिडॉर (CPEC) चा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांना दुबार पेरणी टाळता येणार; फडणवीसांनी मान्सूनच्या आगमापूर्वी आखला मास्टर प्लॅन
दरम्यान ज्यावेळी अफगानिस्तानची सत्ता तालीबान या कट्टरवादी गटाच्या हातात गेली. त्यावेळी देखील त्याला समर्थन करणाऱ्या देशांमध्ये चीनच आघाडीावर होता. मात्र त्यानंतर आता भारत आणि अफगानचे संबंध सुधारू लागल्याने चीन पुन्हा एकदा अफगानशी जवळीक साधत आहे. तर चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॅरिडॉर (CPEC) चा एक भाग हा पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या काश्मिरमधून जात आहे. त्यामुळे भारताने यावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळेच भारताने या प्रकल्पामध्ये सहभागी होण्यास देखील नकार दिला आहे. हा जवळपास 60 बिलियन डॉलरचाप्रोजेक्ट आहे.