विधानसभा निवडणुकीत प्रतिसाद का मिळाला नाही? …मनोज जरांगेंनी आत्मचिंतन करावं, लक्ष्मण हाकेंचा सल्ला

OBC Leader Laxman Hake Criticize Manoj Jarange Patil : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यात नेहमीच खडाजंगी सुरू असते. जरांगे पाटील छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून आक्रमक झाले आहेत. सातत्याने त्यांच्यावर टीका करत आहेत. यावरून मात्र ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी त्यांना आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला आहे.
नांदेड दौऱ्यादरम्यान लक्ष्मण हाके यांनी (OBC Leader) म्हटलंय की, आता खूप कमी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या पंचायत राजमधल्या आरक्षणासंदर्भात माननीय न्यायालयाने जो निर्णय दिलेला (Maharashtra Politics) आहे, त्याचबरोबर ओबीसी बांधवांचे जे मूळ ओबीसी आहेत, त्यांच्या बाबतीमध्ये सामाजिक अन्याय झालेला आहे. त्या लोकांना एकत्रित करणे, त्या लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व कसं भेटेल? त्या लोकांना जास्तीत जास्त निर्णय प्रक्रियेमध्ये कसं जाता येईल? या दृष्टिकोनातून त्यांच्यात अवेअरनेस निर्माण व्हावा, त्यांच्यामध्ये एकोपा निर्माण व्हावा, या दृष्टिकोनातून आम्ही या महाराष्ट्रामध्ये एक लॉंग मार्च काढणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आमच्या ओबीसीच्या माजी नगरसेवक, माजी झेडपी सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, अनेक नेते यांच्या गाठीभेटी घेण्याचा आम्ही कार्यक्रम सुरू केलेला आहे. त्या संदर्भात मी नांदेडला आलो आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने सर्व विक्रम मोडले, जगभरात मिळाले 65.3 अब्ज लाईव्ह व्ह्यूज
मनोज जरांगे (Maratha Aandolak) अजित पवारांना म्हणतात की, याची किंमत मोजावी लागेल. किंमत त्यांनी विधानसभेला मोजली आहे.अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही रात्रंदिवस शिव्या देत होते, ते वाजत गाजत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे किंमत मोजायचा प्रश्न उरतो कुठे? तुम्हीच किंमत मोजा की, आपल्या भूमिकेमुळे नक्की काय झालं? महाराष्ट्रमध्ये तुमच्या आव्हानाला विधानसभेला का प्रतिसाद मिळाला नाही. या गोष्टीचे आत्मचिंतन जरांगेंनी कधीतरी, कुठेतरी केव्हा करावं कुणाचा तरी सल्ला मानावा, ऐकावं, लोकशाही, लोकनियुक्त आमदार, लोकनियुक्त मंत्री, लोक नियुक्त मुख्यमंत्री यांच्यावर बोलणं, पाणचट जोक करणं बंद करावे आणि मराठा समाजावर असे काय वाईट वेळ आली आहे? की पाणचट जोक मारणाऱ्या शिव्या देणाऱ्या माणसाचं नेतृत्व तुम्हाला करावं लागतंय.
रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा
कुठे वसंत दादा पाटील, यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, कुठे जयंत पाटील, कुठे विखे पाटील, कुठे जयंत पाटील, काय नेता तुम्ही निवडला आहे? जो पाणचट जोक मारतो, जो शिवराळ भाषेत बोलता, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर छगन भुजबळांसारख्या माणसाला अश्लील भाषेमध्ये बोलतो. त्याचवेळी आमच्या माता भगिनी टीव्ही बघत असताना, त्यांची मान खाली जाते अशा भाषेत बोलतात. मराठा बांधवांचं किती नुकसान झालं? जरांगेंनी या गोष्टीचा आत्मचिंतन करावं, असं देखील लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय.