Download App

Mallikarjun Kharge सोबत अनेक MP राष्ट्रपती अभिभाषणाला राहणार अनुपस्थित, Jairam Ramesh यांनी सांगितलं कारण

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत. काँग्रेस पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत

जयराम रमेश यांनी ट्विट करुन सांगितल आहे की, खराब हवामानामुळे श्रीनगर विमानतळावरून उड्डाणांना उशीर झाला. त्यामुळे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे इतर अनेक खासदार आज सकाळी ११ वाजता संसदेच्या दोन्ही सभागृहात होणाऱ्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकणार नाहीत.

अधीर रंजन श्रीनगर विमानतळावर अडकले

काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे हवामान खराब झाले आहे. मी श्रीनगर विमानतळावरच अडकलो आहे. त्यामुळे मी आज संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उपस्थित राहू शकेन. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मी त्याबद्दल लोकसभा अध्यक्ष यांनाही कळवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags

follow us