प्रोजेक्ट टायगरवर काँग्रेसने मोदींना डिवचले ! रमेश म्हणाले, ५० वर्षांपूर्वीच्या…

Jairam Ramesh criticizes Modi over Project Tiger : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 9 एप्रिल रोजी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना (Bandipur and Mudumalai Tiger Project भेट दिली. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीही केली. सफारीदरम्यान पीएम मोदींचे अनेक फोटो समोर आले आहेत ज्यात […]

Untitled Design   2023 04 09T171550.443

Untitled Design 2023 04 09T171550.443

Jairam Ramesh criticizes Modi over Project Tiger : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 9 एप्रिल रोजी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पांना (Bandipur and Mudumalai Tiger Project भेट दिली. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी बांदीपूर व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारीही केली. सफारीदरम्यान पीएम मोदींचे अनेक फोटो समोर आले आहेत ज्यात ते वन्यजीवांचे फोटो कॅमेऱ्यात कैद करताना दिसले. दरम्यान, पीएम नरेंद्र मोदींच्या या टायगर सफारीवर कॉंग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केला. तसचं या प्रोजेक्ट टायगरचं श्रेय इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी देत या प्रकल्पाचं श्रेय लुटू नका, अशी टीका कॉंग्रेसने केली.

देशभरात व्याघ्र संवर्धनासाठी सुरू झालेल्या प्रोजेक्ट टायगर या अभियानाला 50 वर्ष पूर्ण झाली. त्याच निमित्ताने पीएम नरेंद्र मोदी हे आज कर्नाटक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान, मोदींना रविवारी देशातील वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी वाघांच्या संवर्धन कार्यात सहभागी असलेल्या फ्रंटलाइन फिल्ड स्टाफशी व स्वयंसेवी संस्थाच्या सदस्यांची चर्चा केली. तसेच मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडून येथील हत्ती कॅम्पलाही भेट दिली. ओपनी जीपमधून मोदी सर्वत्र फिरले. तसेच दुर्बिनीद्वारे त्यांनी निरीक्षणही केले. त्यांनी फोटोही काढले. यावेळी त्यांच्या लुकचीही चर्चा झाली. प्रोजेक्ट टायगर या अभियानाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मोदींनी एक विशेष नाणेही जारी केले. तसेच इंटरनॅशनल बिग कट अलायन्सची घोषणा केली. मात्र, 50 वर्षापूर्वी सुरु झालेल्या प्रकल्पाच श्रेय मोदी लाटतील, असं म्हणत कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदींवर टीका केली.

अयोध्या दौऱ्यासाठी तीन ट्रेन, दोन विमान; मंत्री आमदार अन् कार्यकर्त्यांची खास बडदास्त

काँग्रेस नेत्याने ट्विट केले
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत टीका केली. जयराम रमेश आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, बांदीपूरमध्ये 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या टायगर प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय आज पंतप्रधान घेतील. तिथं जाऊन ते तमाशा करतील. खरंतर पर्यावरण, जंगल, वन्यजीव आणि वनक्षेत्रात राहणारे आदिवासी यांच्या रक्षणासाठी केलेले सर्व कायदे मोडीत काढले जात आहेत किंवा पायदळी तुडवले जात आहेत. मात्र, मोदी याचं श्रेय घेतील, पण वास्तव निराळं आहे, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रोजेक्ट टायगर ला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त देशातील वाघांची ताजी आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार देशात सध्या 3 हजार 167 वाघ आहेत. 2018 मध्ये हाच आकडा 2 हजार 967 एवढा होता.

याशिवाय कर्नाटक कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी विविध प्रकारचे ट्विट केले. त्यात असं म्हटलं गेल की, कायम हा प्रश्न विचारला जातो की, 70 वर्षात कॉंग्रेसने काय केलं? 1973 मध्ये बांदीपूर प्रकल्पाची सुरूवात ही तत्कालीन इंदिरा गांधी यांच्या सरकारने केली आहे. आज जे टायगर सफारीचा आनंद घेत आहेत, त्यांना आम्ही सांगू इच्छितो की, वांघांची संख्या वाढली आहे. तसंच बांदीपूर अभयारण्य अदांनींना विकू नका, असा खोचक टोलाही लगावला आहे.

Exit mobile version