Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) भारतीय लष्कराला मोठं यश आलं आहे. याठिकाणी सैन्याने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये सैन्याने या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला. सध्या भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधी मोहिम राबवली आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
Aditya Thackery यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?
भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीरमध्ये कुलगाम पोलिसांच्या दहशतवाद्यांविरोधी मदतीने सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या दरम्यान भारतीय लष्कराला माहिती मिळाली होती की, कुलगाममधील नेहामा गावामध्ये दहशतवादी लपले आहेत. त्यानंतर भारतीय सैन्याच्या सुरक्षा दलाने या गावाला वेढा दिला. पोलिसांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली.
Horoscope Today: ‘वृषभ’ राशीच्या व्यक्तींना सावधगिरी बाळगावी लागणार आहे!
यावेळी या दहशतवाद्यांनी सैन्य दलावर गोळीबार केला. त्यानंतर सैन्याच्या बचावाच्या भूमिकेमध्ये पाच दहशतवादी मारले गेले. ज्यामध्ये समीर अहमद शेख, यासीन बिलाल भट, दानिश अहमद ठोकर, हंजुल्ला याकुब शाह आणि उबेद अहमद पदर या पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या सर्व दहशतवाद्यांकडे चार एके रायफल चार ग्रेनेड आणि दोन पिस्तुल्यांसह आक्षेपार्ह साहित्य शस्त्र आणि दारूगोळा आढळून आला आहे. त्यामुळे हे स्पष्ट होत आहे. की, हे मारले गेलेले दहशतवादी जम्मू-काश्मीरमधील नागरिकांवर अत्याचार तसेच दहशतवादी कारवाई करण्यासाठी आलेले होते.
Telangana : मुलींच्या लग्नात सोनं ते मोफत टू व्हीलर, काँग्रेसकडून आश्वासनांची खैरात
या कारवाई बद्दल दक्षिण काश्मीर विभागाचे पोलीस उप महानिरीक्षक रईस भट यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितलं की, हे दहशतवादी लपले असल्याची गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त कारवाईमध्ये या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. हे दहशतवादी लष्कर-ए- तोयबाचे असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.