Telangana : मुलींच्या लग्नात सोनं ते मोफत टू व्हीलर, काँग्रेसकडून आश्वासनांची खैरात
Telangana : तेलंगणासह (Telangana) देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार प्रचार मोहीम सुरू आहे. त्यामध्ये भाजप असो किंवा काँग्रेस यांनी आपल्या प्रचाराच्या जाहीरनाम्यामध्ये मतदारांना आश्वासनांची अक्षरशः खैरातच वाटली. तेलंगणामध्ये काँग्रेसने मुलींच्या लग्नामध्ये सोनं मोफत टू व्हीलर देण्याचं आश्वासन दिलं आहे.
भुजबळांना फडणवीसांनीच जरागेंच्या विरोधात उभं केलं, अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
तेलंगणामध्ये इतिहास 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यातील काँग्रेस आणि भाजप यांच्या स्थानिक पक्ष प्रचाराला लागले आहेत. त्यामध्ये आता काँग्रेसने निवडणुकीमध्ये मतदारांना आकर्षित करणारा असा आपला जाहीरनामा सादर केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये मतदारांना देण्यात आलेल्या आश्वासनांची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे कारण या आश्वासनांमध्ये थेट मुलींच्या लग्नामध्ये सोनं देण्यापासून तरुणींना मोफत टू व्हीलर देण्याचे देखील आश्वासन देण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींनाही डीपफेकचा फटका, युजर्संना दिला महत्त्वाचा सल्ला
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये आज शुक्रवारी काँग्रेसचा हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल. या जाहीरनाम्यामध्येकोणकोणती आश्वासन देण्यात आली पाहुयात…
कॉंग्रेसच्या या जाहिरनाम्यात अवघ्या 500 रूपायांमध्ये एलपीजी सिलेंडर (स्वयंपाकाचा गॅस) आणि मोफत वीज दिलं जाणार आहे. मुलींच्या लग्नात सोनं आणि रोख पैसे, तरूणींना टू व्हिलर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर तेलंगणा हे वेगळं राज्य निर्माण करण्यासाठी कॉंग्रेस आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधींनीच प्रयत्न केले असल्याचे यावेळी खरगे यांनी सांगितले. तसेच यावेळी खरगे यांनी भाजपवर टीका देखील केली. ते म्हणाले की, रामाच्या नावाने मतं मागणाऱ्यांनी काहीही दिले नाही. तर आम्ही कर्नाटकामध्ये जनतेला दिलेली अश्वासन पुर्ण करत आहोत. महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिल्या जात आहेत. असं यावेळी खरगेंनी सांगितलं.