Download App

अखेर ‘त्या’ वक्तव्यावर Javed Akhtar यांनी सोडले मौन; म्हणाले, पाकिस्तानात तर..

Javed Akhtar : पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानला (Pakistan) खडे बोल सुनावल्यानंतर गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांचे भारतात कौतुक होत आहे.तर मात्र पाकिस्तानातील जनता त्यांच्या विरोधात गेली आहे. पाकिस्तानात त्यांनी एका कार्यक्रमात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार तुमच्या (पाकिस्तान) देशात खुलेआम फिरत आहेत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर त्यांनी अखेर मौन सोडले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना त्या घटनेवर अख्तर यांनी आपल्या विधानाचा पुनरुच्चार केला आणि म्हणाले, की हे वक्तव्य इतके मोठे होईल याची मला कल्पना नव्हती. मी आता याबद्दल अधिक काही बोलू नये असे वाटते. मला या गोष्टी सांगायच्या होत्या, गप्प बसायचं का? नाही, नाही.. माझ्या विधानाने पाकिस्तानात दहशत निर्माण झाली आहे, हे आता मला जाणवत आहे.

हे वाचा : मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तुमच्या देशात खुलेआम फिरतात; जावेद अख्तरांनी पाकिस्तानात जाऊन सुनावले

मी कोणते तिसरे महायुद्ध जिंकले?

जावेद अख्तर पुढे म्हणाले की पाकिस्तानमधील लोक त्यांच्या सरकारला विचारत आहेत की मला व्हिसा का देण्यात आला ? आता मला फक्त एकच गोष्ट आठवेल की तो कोणत्या प्रकारचा देश आहे. ज्या देशात माझा जन्म झाला आहे. तिथे सुद्धा मी न घाबरता माझी मते व्यक्त केली आहेत. जर मी माझ्या देशात भीतीने जगत नाही, तर मला इथे (पाकिस्तानात) कशाची भीती वाटेल ?

Pakistan Blast: पेशावर हल्ल्यानंतर पाकिस्तानने घेतली तालिबानची मदत

पाकिस्तानात खळबळ उडाली

ते पुढे म्हणाले की, सर्व पाकिस्तानी सारखेच आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. असेही लोक आहेत ज्यांना भारतासोबत शांतता हवी आहे. शेजारी देश भारताची प्रगती कशी होते आहे हे ते लोक बघत आहेत. कॉर्पोरेट, संस्कृती, चित्रपट, संगीत आणि उद्योगात भारताची प्रगती कशी झाली आहे. त्या लोकांनाही ही संस्कृती आपल्या देशात आणायची आहे. तिथल्या लोकांनी माझं मनापासून स्वागत केलं.

Tags

follow us