‘मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तुमच्या देशात खुलेआम फिरतात’; जावेद अख्तरांनी पाकिस्तानात जाऊन सुनावले

‘मुंबई हल्ल्यातील सूत्रधार तुमच्या देशात खुलेआम फिरतात’; जावेद अख्तरांनी पाकिस्तानात जाऊन सुनावले

Javed Akhtar : प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी थेट पाकिस्तानात (Pakistan) जाऊन तेथील एका कार्यक्रमात पाकिस्तानला चांगलेच सुनावले. लाहोर येथील एका कार्यक्रमात ते म्हणाले, की मुंबई हल्ल्याचे सूत्रधार येथे खुलेआम फिरत आहेत. उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अख्तर लाहोरला पोहोचले होते. अख्तर यांच्या या विधानाचे अभिनेत्री कंगना रनोतनेही (Kangana Ranaut) कौतुक केले.

या कार्यक्रमात अख्तर यांना एक प्रश्न विचारण्यात आला. त्यामध्ये म्हटले होते की भारतात जाऊन तुम्ही पाकिस्तानी लोक चांगले आहेत असे म्हणणार का ? कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्यांना विचारले की, तुम्ही अनेकदा पाकिस्तानात आला आहात. तुम्ही परत जाल तेव्हा तुमच्या लोकांना सांगाल की पाकिस्तानी चांगले लोक आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात अख्तर म्हणाले, की आपण एकमेकांवर आरोप करू नये. यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही. मुंबईवर कसा हल्ला झाला ते आपण पाहिले आहे. ते दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते.ते दहशतवादी तुमच्याच देशात मोकळेपणाने फिरत आहेत. त्याविरोधात भारतीयांनी तक्रार केली आहे.

हे वाचा : Pakistan Crisis : पाकिस्तान की कंगालस्थान? चीनच्या कर्जात पाकिस्तान बुडाला, महागाई शिखरावर

पाकिस्तानी गायक आणि अभिनेता अली जफरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो जावेद अख्तरसोबत दिसत आहे. जावेद अख्तर यांनी लिहिलेले “एक लडकी को देखा तो ऐसा लगा’ हे गाणे तो गात आहे. अली जफरसोबत जावेद अख्तरही गाताना दिसले. या मेळाव्यात इतर पाकिस्तानी कलाकार आणि सेलिब्रिटीही उपस्थित होते.

लता मंगेशकर यांच्या पाकिस्तानातील कामगिरीच्या मुद्द्यावरही जावेद अख्तर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही भारतात नुसरत फतेह अली खान आणि मेंहदी हसन यांचे मोठे कार्यक्रम केले आहेत. दुसरीकडे, लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम तुमच्या देशात झालेला नाही.”

Pakistan : पाकिस्तानची बत्ती गुल; तर अर्थव्यवस्थाही कोलमडली…

कंगनाने केले कौतुक – घरात घुसून मारले

अभिनेत्री कंगना रनोटने जावेद अख्तर यांच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे. ती म्हणाली, की माणसात काही तरी सत्य आहे. तरच त्यांच्यासोबत खणखणीतपणा आहे. जय हिंद. घरात घुसून मारले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube