बेंगळुरू : राजकारणी, त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे सार्वजनिक ठिकाणी नागरिकांशी वाईट पद्धतीने वागतात. असाच प्रकार कर्नाटकात घडला आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे सून आणि एचडी रेवन्ना पत्नी भवानी (Bhavani Revanna) यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भवानी रेवन्ना ही दुचाकीस्वाराला ओरडून वाईट पद्धतीने बोलत आहे. दुचाकी ही भवानी यांच्या कारला येऊन धडकली आहे. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आहे.
Songya Trailer: ‘एका लढवय्या मुलीची कहाणी’; सोंग्या सिनेमाचा प्रेरणादायी ट्रेलर रिलीज
माझ्या कारचे नुकसान करण्याएेवजी एखाद्या बसखाली जाऊन मर, असे शब्द भवानी रेवन्ना यांनी वापरल्याचे व्हिडिओत दिसत आहे. वाहनांच्या अपघातानंतर तेथे नागरिकांची गर्दी झाली होती. भवानी रेवन्ना या लोकांवरही ओरडून बोलत आहे. माझ्या कारची किमत दीड कोटी रुपये आहे. या कारचे नुकसान कोण भरून देईल, असा प्रश्न भवानी यांनी विचारला आहे. स्थानिक नागरिक हे भवानी रेवन्ना यांना समजून सांगत होते. परंतु त्या त्यांच्यावरच चिडलेल्या दिसल्या आहेत.
‘पवारांचा नातू असूनही मंत्री नव्हतो आमदारच होतो’; रोहितदादांचा रोख कुणाकडे?
A video shows former prime minister #HDDeveGowda’s daughter-in-law & #JDS leader #BhavaniRevanna yelling at villagers after a two-wheeler allegedly damaged her pricey Toyota Vellfire.#Karnataka #Mysuru #RoadAccident #HDRevanna pic.twitter.com/I4GRvgoGVQ
— Hate Detector 🔍 (@HateDetectors) December 4, 2023
एकमेंकाविरुद्ध गुन्हे दाखल
जेडीएसच्या नेत्या भवानी रेवन्ना यांची कार आणि दुचाकी यांच्यामध्ये अपघात झाला होता. लोकांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला नाही. त्यानंतर दोघांनी एकमेंकाविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. भवानी रेवन्ना यांच्या कारचालकाने दुचाकीस्वार शिवन्ना याच्याविरुद्ध फिर्याद नोंदविली आहे. तर बाईकस्वारानेही भवानी रेवन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. म्हैसूर जिल्ह्यातील सालिग्राम पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आलेले आहेत.