Download App

भाजपने फोडला राष्ट्रवादीचा आमदार; निवडणुकीआधीच अजितदादांना मोठा झटका..

हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमलेश कुमार सिंह भाजपात प्रवेश करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Ajit Pawar NCP : महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुका (Maharashtra Elections) होणार आहेत. या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून लवकरच (Election Commission) होऊ शकते. याच बरोबर झारखंड राज्याच्या निवडणुकीचीही (Jharkhand Elections) घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांत फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. महाराष्ट्रात महायुती अभेद्य असून एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे नेते मंडळी सांगत आहेत. मात्र अंतर्गत धुसफूस रोजच चव्हाट्यावर येत आहे. अशीच धुसफूस झारखंडातही होत (Jharkhand Politics) असून येथे तर एकमेकांचे आमदार फोडाफोडीपर्यंत मजल गेली आहे. येथील हुसैनाबाद विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कमलेश कुमार सिंह (kamlesh Kumar Singh) लवकरच भाजपात प्रवेश करतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

Mahayuti Meeting: महायुतीच्या प्रमुख नेत्यांची ‘वर्षा’वर खलबतं; विधानसभा निवडणुकीचा प्लॅन ठरला

आमदार कमलेश सिंह यांचा भाजपातील प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. येत्या 3 ऑक्टोबर या घटस्थापनेच्या दिवशी ते भाजपात प्रवेश करतील असे सांगण्यात येत आहे. आसाम राज्याचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांच्या उपस्थितीत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्वतः कमलेश कुमार सिंह यांनीच सांगितले.

आमदार सिंह यांच्यासह त्यांचे पुत्र एनसीपीचे प्रदेश प्रवक्ते सूर्य सिंह आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्तेही भाजपाचा झेंडा हाती घेणार आहेत कमलेश सिंह सध्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्षही आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यापासून झारखंडात ते पक्षासोबत होते. राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर त्यांनी अजितदादांना साथ दिली. आता मात्र निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याचं नक्की केलं आहे.

त्यांच्या या निर्णयामुळे झारखंड निवडणुकीत भाजपला हुसैनाबाद मतदारसंघात बळकटी मिळणार आहे. कमलेश कुमार सिंह 2005 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आमदार झाले होते. झारखंड राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही सांभाळलं आहे. मधू कोडा, शिबू सोरेन, अर्जुन मुंडा यांच्या मंत्रिमंडळातही त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे.

दोन निवडणुका पराभूत झाल्यानंतर 2019 च्या निवडणुकीत मात्र जनतेने त्यांना आमदारकी दिली. आता मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच झारखंडात राजकारणाचं वारं फिरलंय असं म्हणण्यास हरकत नाही. आता कमलेश कुमार सिंह यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि झारखंडच्या स्थानिक राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अखेर मुहू्र्त मिळाला! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ‘या’ दिवशी सुनावणी; फैसला होणार?

follow us