अखेर मुहू्र्त मिळाला! शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ‘या’ दिवशी सुनावणी; फैसला होणार?
MLA Disqualification Case : राज्यातील दोन मोठे पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. दोन्ही पक्षांत फूट पडली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादीतून अजित पवार (Ajit Pawar) बाहेर पडले. दोघांचेही गट सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राज्यातील सत्तासंघर्ष थेट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचला. आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या. या याचिकांवर युक्तिवादही झाला आहे. मात्र मध्यंतरीच्या काळात याचिकांवरील सुनावणी रखडली होती. तारखांवर तारखा पडत होत्या. त्यामुळे राजकीय पक्षांत अस्वस्थता वाढली होती. सुनावणी कधी होणार असा प्रश्न विचारला जात होता. आता अखेर या सुनावणीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या मंगळवारी (24 सप्टेंबर) सुनावणी होणार आहे.
आमदार अपात्रेतचं भिजत घोंगडं; सुप्रीम कोर्टाकडून दोन आठवड्यांची मुदतवाढ
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड निवृत्त होणार आहेत. अशा परिस्थितीत आमदार अपात्रतेची सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे ज्येष्ठ वकिल अभिषेक मनू सिंघवी यांनी प्रकरण मेन्शन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी 24 सप्टेंबर तारीख देण्यात आली आहे. तरीदेखील या दिवशी दुसरी एक मोठी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी मंगळवारी होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड येत्या 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे निवृत्तीच्या आधी निकाल येईल का याची प्रतिक्षा आहे. शिवसेनेच्या आमदारांचं प्रकरण अतिशय क्लिष्ट आहे. चंद्रचूड यांच्या कार्यकाळात अनेक महत्वाचे निकाल आले आहेत. त्यामुळे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कार्यकाळात या प्रकरणाचा निकाल येणार का याची उत्सुकता आहे.
घड्याळाचा फैसला निवडणुकीआधी करा
दरम्यान आमदार अपात्रता प्रकरणाप्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. विधानसभा निवडणुकीआधी पक्षचिन्हाबाबत निर्णय घ्या किंवा घड्याळ चिन्ह गोठवा अशी मागणी करणारी याचिका शरद पवार गटाने न्यायालयात दाखल केली आहे. न्यायालयाने ही याचिका तातडीने सूचीबद्ध करावी अशी मागणी शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती. त्यानुसार याचिका सूचीबद्ध करण्यात आली असून या याचिकेवर येत्या 25 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मोठी बातमी : निवडणुकीआधी घड्याळाचा फैसला करा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची न्यायालयात याचिका
या नवीन चिन्हासह शरद पवार यांच्या पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली. यात त्यांना चांगलं यश मिळालं. शरद पवार गटाचे आठ खासदार निवडून आले. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र एकच जागा मिळाली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला खरा पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या आयोगाच्या निर्णयाला शरद पवार गटाने आव्हान दिलं होतं.