Jio and Airtel Launch Hourly Data Plans : आतापर्यंत तुम्ही जे काही मोबाईल रिचार्ज प्लॅन घेतले असतील, ते डेली किंवा संपूर्ण महिन्यासाठीचे डेटा पॅक (Data pack) असतं. पण आता भारतातील दोन टॉप टेलिकॉम कंपन्या जिओ आणि एअरटेल (Jio and Airtel) यांनी एक नवा डेटा पॅक लॉन्च केलाय. या दोन्ही कंपन्यांनी ११ रुपयांचे डेटा प्लॅन सुरू केलेत. या डेटा प्लान घेतला तर १० जीबी डेटा एका तासासाठी युजर्संना वापरता येणार आहे. दरम्यान, या डेटा प्लॅनचे फायदे आणि तोटे काय आहेत? याच विषयी जाणून घेऊ.
हुश्श.. आणखी एक विमान अपघात टळला; पायलटचा Mayday मेसेज अन् विमानाचं लँडिंग
जिओ आणि एअरटेलचा नवीन प्लॅन काय आहे?
आतापर्यंत, भारतात असे डेटा प्लान उपलब्ध होते, ज्यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा उपलब्ध होता. सोबत अनलिमिटेड कॉलिंगचीही सोय होती. पण आता जिओ आणि एअरटेल या दोन्ही कंपन्यांनी ११ रुपयांचा नवीन डेटा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला १० जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल, परंतु फक्त १ तासासाठी हा डेटा वापरता येणार आहे. हा एक अॅड-ऑन प्लॅन आहे. तो तुमच्या विद्यमान रिचार्जसह वापरता येणार आहे.
हा प्लॅन कोणासाठी ठरणार उपयुक्त ?
हा प्लॅन विशेषतः कमी वेळेसाठी डेटा आवश्यक असलेल्या वापरकर्त्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच जेव्हा तुम्हाला फक्त काही मिनिटांसाठी एचडी व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता असेल तेव्हा हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो. एखादी महत्त्वाची फाइल किंवा प्रोजेक्ट लवकर डाउनलोड करायचा असेल किंवा अचानक हाय-स्पीड इंटरनेटची आवश्यकता असेल तेव्हा हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो.
युजर्संना फायदा की तोटा?
तुम्ही तुमच्या सोयीनुसार डेटा वापरू शकता. यामुळे तुम्हाला संपूर्ण दिवसासाठी महागडा प्लॅन खरेदी करण्याची गरज भासणार नाही. मात्र, ज्यांना संपूर्ण दिवस इंटरनेटची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन काम करणार नाही. कारण हा डेटा प्लॅन १ तासानंतर डेटा बंद होणार असतो.