Download App

Jio Cinema चा सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच, आवडते शो पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे

Jio Cinema Premium Subscription Plan : मागील गेल्या काही दिवसांपासून जिओ सिनेमा (Jio Cinema) चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारण म्हणजे आजवर पाच पैशाची खिशाला झळं न पोहोचू देता जिओ सिनेमावर अनेक सिनेमे (movies), आयपीएल सामने (IPL matches) मोफत पाहता येत होते. मात्र, त्यानंतर जिओ सिनेमाचे पेड वर्जन येणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आणि आजपासून ही मोफत सेवा बंद होणार असून आता जिओ सिनेमाने आपला प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅन (Premium Subscription Plan) लॉन्च केला आहे.

जिओ सिनेमा हे एक अॅप असून यावर युजर्ससाठी सगळ्या प्रकारचा कंटेंट हा विनामूल्य आहे. अट एवढीच आहे की, फक्त आपल्या मोबाईलमध्ये रिचार्च असावा. रिचार्ज असेल तर आपल्याला सिनेमा, मालिका, आयपीएलचा मोफत आनंद घेता येतो. मात्र, आता जिओ सिनेमा मनोरंजनाचा आनंद घ्यायचा असेल तर पैसे मोजावे लागणार आहेत.

तुम्ही Jio Cinema अॅपच्या Subscribe Now विभागात हा प्लॅन पाहू शकाल. रिलायन्स जिओ सिनेमाच्या या प्रीमियम सबस्क्रिप्शन प्लॅनची ​​किंमत 999 रुपये आहे. या प्लॅनची ​​वैधता 1 वर्षाची आहे. यामध्ये तुम्हाला सध्या HBO शोज मिळतील. यापूर्वी हे सर्व शो Disney+ Hotstar वर उपलब्ध होते. दोन्ही कंपन्यांची भागीदारी संपल्यानंतर गेल्या महिन्यात डिस्ने+ हॉटस्टारवरून ही सामग्री काढून टाकण्यात आली. दरम्यान, हे सबस्क्रिप्शन आयपीएलसाठी आवश्यक आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी एचबीओसह इतर चित्रपट आणि अन्य कंटेट पाहण्यासाठी सदस्यता आवश्यक असेल.

Sushama Andhare : हे निकाल ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’, म्हणणाऱ्यांसाठी चपराक

सदस्यता कशी मिळवायची?
Jio Cinema ने IPL 2023 मोफत प्रसारित करून गेल्या एका महिन्यात लाखो वापरकर्ते जोडले आहेत. तसेच, आयपीएल 2023 च्या दर्शकांनीही विक्रम मोडले आहेत. या संधीचा फायदा घेत जिओने हा प्रीमियम प्लॅन सादर केला आहे. यासाठी तुम्हाला Jio Cinema अॅपवर लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या प्रोफाइल विभागात Subscribe Now हा पर्याय दिसेल. तुम्ही त्यावर टॅप करताच तुम्हाला प्रीमियम सबस्क्रिप्शन घेता येईल.

प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर, तुम्ही या OTT प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंट जाहिरातींशिवाय पाहू शकाल. विनामूल्य वापरकर्त्यांना HBO विशेष कंटेटमध्ये प्रवेश नसेल. यासह, ते जाहिरातींसह इतर टीव्ही शो, वेब कथा आणि चित्रपट इत्यादी पाहू शकतील.

Voot बंद होणार?
अलीकडेच, Jio Cinema चे सहयोगी OTT अॅप Voot बंद होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्याऐवजी Jio Cinema Voot प्लॅटफॉर्म लॉन्च केला जाऊ शकतो. तथापि, आता रिलायन्सने Jio Cinema Premium सह डिजिटल मनोरंजन विभागात प्रवेश केला आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, झी 5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मवरून त्याला कठीण स्पर्धा मिळणार आहे. सध्या, या OTT अॅपसाठी फक्त एक प्रीमियम सदस्यता योजना उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत मासिक किंवा त्रैमासिक योजनाही येऊ शकतात.

HBO शो
Jio सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रिप्शन घेऊन, वापरकर्ते HBO चे खालील शो पाहण्यास सक्षम होतील. विनामूल्य वापरकर्त्यांना या शोमध्ये प्रवेश नाही.
-The Last of Us
-House of the Dragon
-Chernobyl
-White House Plumbers
-White Lotus
-Mare of Easttown
-Winning Time
-Barry Succession
-Big Little Lies
-Westworld
-Silicon Valley
-True Detective
-Newsroom
-Game of Thrones
-Entourage
-Curb Your Enthusiasm
-Perry Mason

Tags

follow us

वेब स्टोरीज