जिओचा IPO मोडणार सर्व विक्रम; होणार भारतातील सर्वात मोठी लिस्टिंग? जाणून घ्या सर्वकाही

JIO IPO : भारतीय शेअर बाजारात रिलायन्स जिओ लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या

JIO IPO

JIO IPO

JIO IPO : भारतीय शेअर बाजारात रिलायन्स जिओ लवकरच मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी पुढील काही दिवसात शेअर बाजारात रिलायन्स जिओ आयपीओ लिस्टिंग करणार आहे. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखालील जिओने, 2016 मध्ये दूरसंचार क्षेत्रात एक ‘क्रांतिकारक बदल घडवणारी कंपनी’ म्हणून प्रवेश केला होता. तर आता 2026 मध्ये कंपनी आकाश अंबानी (Akash Ambani)  यांच्या नेतृत्वाखाली आयपीओ आण्याच्या तयारीत आहे.

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या आयपीओवर (JIO IPO) 2026-27 या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या काही महिन्यातच प्रक्रिया सुरु होणार असून शेअर बाजारात लिस्टिंग काही महिन्यात होणार आहे. रिलायन्स जिओची (Reliance Jio) कामगिरी पाहाता या आयपीओची भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) सर्वात मोठी लिस्टिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीओ अंतर्गत कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्समधील 2.5  टक्के शेअर ऑफर फॉर सेल या मार्गाद्वारे विकणार आहे. म्हणजेच कंपनी कोणतेही नवीन शेअर जारी करणार नाही तर विद्यामान गुंतवणूकदार आपला हिस्सा विकणार आहे. या प्रक्रियेत फक्त 2.5  टक्के हिस्सा विकला जाणार आहे.

जिओ प्लॅटफॉर्म्स लवकरच DRHP (Draft Red Herring Prospectus) दाखल करण्याच्या तयारीत आहे. या आयपीओची एकूण किंमत 3 अब्ज डॉलर्सपेक्षा (सुमारे ₹25,000+ कोटी) जास्त असू शकते. कंपनीचे संभाव्य मूल्यांकन 125 अब्ज डॉलर्स (₹10 लाख कोटींहून अधिक) इतके असू शकते.ज्यामुळे हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ ठरेल.

‘होर्मुझची सामुद्रधुनी ‘ पुन्हा सुरु करा, ट्रम्प यांनी इराणला दिले फक्त 48 तास-

मे 2022 मध्ये आलेला भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (LIC) आयपीओ 2.5 अब्ज डॉलर्सचा होता, तर ऑक्टोबर 2024 मध्ये आलेला ह्युंदाईचा आयपीओ 2.97 अब्ज डॉलर्सचा होता. भारतामध्ये, जिओ ही 491 दशलक्षांहून अधिक वायरलेस ग्राहकांसह सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे.

Exit mobile version