कोणता IPO घ्याल ?, नफा मिळेल का ? ; फायदेशीर आयपीओसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

कोणता IPO घ्याल ?, नफा मिळेल का ? ; फायदेशीर आयपीओसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

IPO : सध्या बाजारात IPO मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा सुरू आहे. अर्थव्यवस्था सुधारण्याच्या आशेने कंपन्या शेअर बाजारात लिस्ट होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या वर्षी आयपीओ मार्केटमध्ये गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. या वर्षी लिस्ट केलल्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला नफा मिळवला. आताही अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे तुम्ही जर आता आयपीओत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

तुम्हाला आयपीओद्वारे चांगला नफा कमवायचा असेल तर योग्य आयपीओ कसा ओळखायचा याची माहिती तुम्हाला असणे गरजेचे आहे.

GDP म्हणजे नक्की काय ?, कसा मोजला जातो ? ; जाणून घ्या, माहिती महत्वाची

प्रवर्तक आणि भागधारक

आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्याचे प्रवर्तक किती मजबूत आहेत ते पहा. कंपनीसाठी त्यांचा दृष्टीकोन काय आहे. कंपनीवर किती विश्वास आहे. याचाही विचार करा. माहिती घ्या. चांगले प्रवर्तक कंपनीला चांगली वाढ देऊ शकतात. त्यामुळे आयपीओ निवडताना याचाही विचार नक्की करा.

वाचा : Gautam Adani : अदानींनंतर ‘या’ उद्योगपतीच्या अडचणीत वाढ, शेअर्समध्ये मोठी घसरण ? 

बिजनेस मॉडेलकडे लक्ष द्या

ज्या कंपनीचा आयपीओ बाजारात येणार आहे. त्या कंपनीच्या व्यवसायाचे मॉडेल काय आहे हे आधी समजून घ्या. अनोखे बिजनेस मॉडेल बाजाराला नेहमीच आवडते. त्यांच्या व्यवसायात पुढे जाण्याची क्षमता आहे की नाही हे ही तपासून पहा.

प्रति शेअर किंमत

आयपीओमध्ये गुंतवणुकीच्या पहिल्या वर्षी प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS ची आधी माहिती घ्या. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षासाठी EPS चा अंदाज लावा. कोणत्याही कंपनीच्या आर्थिक स्थितीवरून EPS निश्चित केला जाऊ शकतो.

Share Market : चार दिवसांत गुंतवणूकदारांनी 7 लाख कोटी रुपये गमावले

किंमत ते कमाई गुणोत्तर तपासा

EPS काढल्यानंतर किंमत के कमाई हे गुणोत्तर मोजा. हे गुणोत्तर सध्याच्या बाजारभावाला प्रति शेअर कमाईने भागून काढले जाते. पण आयपीओसाठी जर सध्याचा बाजारभाव उपलब्ध नसेल तर आयपीओ वरची किंमत बँड येथे वापरली जाते.

शेअर किंमत पहा

जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करणार असाल तर प्रथम त्याच्या अप्पर प्राइस बँडवर लक्ष द्या. शेअरच्या किंमतीवरून त्याचे योग्य मूल्यांकन करता येते. अन्य कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतींचाही विचार करा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube