Gautam Adani : अदानींनंतर ‘या’ उद्योगपतीच्या अडचणीत वाढ, शेअर्समध्ये मोठी घसरण ?
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपण उद्योगपती गौतम अदानींच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अडचणीत पाहत आहोत आता यामध्ये आणखी एका उद्योगपतीला अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनिल अग्रवाल हे या उद्योगपतीचं नाव आहे. अनिल अग्रवाल हे वेदांता ग्रुपचे मालक आहेत. नुकतंच त्यांच्या वेदांताच्या डॉलर बॉन्ड्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या शेअर्सवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वेदांत रिसोर्सेस लिमिटेड प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेली आहे. पण भारत सरकारने अनिल अग्रवाल यांना त्यांच्या इंटरनॅशनल झिंक अॅसेटची उपकंपनी हिंदुस्तान झिंक विकण्यापासून रोखले आहे. ही डील 2.98 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 24,500 कोटींमध्ये होणार होती. पण सरकारने हा व्यवहार पुढे नेल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. हिंदुस्तान झिंकमध्ये सरकारची जवळपास 30% भागीदारी आहे.
Gautam Adani Business : अदानींच्या कंपन्यांचा आतापर्यंतचा प्रवास
दरम्यान गेल्यावर्षी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली वेदांता रिसोर्सेस त्यांच्याच मुंबईतील लिस्टेड वेदांता लिमिटेडमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत ही कंपनी त्यांच्यावरील कर्ज $10 बिलियन वरून $8 बिलियन पर्यंत कमी करण्यात यशस्वी झाली आहे. तर आता चालू आर्थिक वर्षात हा कर्जाचा बोजा $7.7 अब्ज पर्यंत कमी करण्यात कंपनीला यश आले आहे. यापैकी त्यांना एप्रिल 2023 मध्ये तीन अब्ज डॉलर्स द्यावे लागणार आहेत.
पण यामध्ये या वर्षाच्या सप्टेंबर ते जानेवारी 2024 दरम्यान कर्ज आणि रोखे परतफेड करण्यासाठी त्यांनी $1.5 अब्ज जमा करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो प्रयत्न यशस्वी झाला नाही. अग्रवाल यांना मोठा धक्का बसला. त्यामुळा आता अदानींचे $24 अब्ज निव्वळ कर्ज अग्रवालच्या तुलनेत तिप्पट मोठे असू आहे. पण अग्रवाल यांचे बाँड्स अजूनही गुंतवणुकीच्या सर्वात खालच्या श्रेणीत आहेत.