Gautam Adani Business : अदानींच्या कंपन्यांचा आतापर्यंतचा प्रवास

  • Written By: Published:
Gautam Adani Business : अदानींच्या कंपन्यांचा आतापर्यंतचा प्रवास

मुंबई : गौतम अदानी… हे नाव सध्या देशात आणि जगात चर्चेत आहे. संपत्तीच्या शर्यतीत ज्या पद्धतीने अदानींनी शून्यातून उंचीचा प्रवास करून सर्वांनाच चकित केले. त्याचवेळी तितक्याच वेगाने मजल गाठल्याची बातमीही चर्चेत आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत आणलेल्या अहवालाने (हिंडेनबर्ग रिपोर्ट) असा भूकंप आणला की त्यांचे विशाल साम्राज्य हादरले. पण, अदानी ग्रुपमध्ये कोणत्या कंपन्या आहेत आणि ते कोणते व्यवसाय करतात हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊया…

गौतम अदानी यांचा परिचय

60 वर्षीय उद्योगपती गौतम अदानी यांचा जन्म 24 जून 1962 रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला. ते त्यांच्या कुटुंबातील पहिल्या पिढीतील व्यापारी आहेत. मधेच शिक्षण सोडून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी त्यांनी व्यवसायात प्रवेश केला होता. 1978 मध्ये त्यांनी पहिल्यांदा हिर्‍यांच्या व्यवसायात हात आजमावला, परंतु 1981 पासून त्यांचे नशीब चमकले, जेव्हा त्यांनी मोठ्या भावाच्या प्लास्टिक व्यवसायात प्रवेश केला. यानंतर 1988 मध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड अस्तित्वात आली. आज अदानी समूहाच्या सात कंपन्या शेअर बाजारात सूचिबद्ध आहेत आणि गेल्या वर्षीच त्यांनी अंबुजा-एसीसी सिमेंटचा त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करून त्यांचा व्यवसाय वाढवला होता.

1991 नंतर व्यवसायाने वेग पकडला

1991 मध्ये अदानी समूहाचा व्यवसाय इतक्या वेगाने वाढला की 2022 मध्ये गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले. 1995 गौतम अदानी यांच्या कंपनीला 8000 हेक्टरमध्ये पसरलेल्या मुंद्रा बंदर चालवण्याचे कंत्राट मिळाले. यानंतर 1996 मध्ये अदानी पॉवर लिमिटेड सुरू झाली. आता अदानी विल्मर, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅससह इतर कंपन्या रेल्वे, विमानतळ, बंदर ते वीज अशा सेवा देत आहेत.

1. अदानी एंटरप्रायझेस

अदानी एंटरप्राइज लिमिटेडची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये केली होती. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक जगतात दमदार एंट्री केली. अदानी एंटरप्राइझ लिमिटेड धातू, शेती उत्पादने आणि कापड यांच्या कमोडिटी व्यापाराशी संबंधित आहे. 2019 पासून या शेअरने 152 ते 4190 पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे या कंपनीनीने 100 पटपेक्षा जास्त इन्कम दिला आहे.

2. अदानी पोर्ट्स

यानंतर गौतम अदानी यांनी 1995 मध्ये अदानी पोर्ट्सच्या माध्यमातून व्यवसायाचा विस्तार केला. सध्या भारतातील 7 सागरी राज्यांमधील 13 बंदरांवर अदानी बंदराचे वर्चस्व आहे. यापैकी मुंद्रा बंदर हे भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर आहे. 2019 पासून या शेअरने 382 ते 987 पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे या कंपनीनीने 250 टक्के इन्कम दिला आहे.

भारतात आले आणखी १२ चित्ते; दक्षिण आफ्रिकेतून आलेले विमान ग्वालेरमध्ये उतरलं 

3. अदानी पॉवर

अदानी पोर्ट्सच्या वाढत्या व्यवसायामुळे प्रोत्साहित होऊन गौतम अदानी यांनी 1996 मध्ये अदानी पॉवर सुरू केली. ऊर्जा क्षेत्रातील अदानी पॉवर लिमिटेड राजे आहेत. कंपनीकडे भारतातील 6 राज्यांमध्ये 12,410 मेगावॅट क्षमतेची थर्मल पॉवर आहे. देशातील सर्वात मोठी खाजगी औष्णिक वीज उत्पादक, या कंपनीचा गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि चंदीगडमध्ये व्यवसाय आहे. 2019 पासून या शेअरने 50 ते 432 पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे या कंपनीनीने 4 वर्षात 900 टक्क्यापेक्षा जास्त इन्कम दिला आहे.

4. अदानी विल्मर

1999 मध्ये सुरू झालेल्या अदानी विल्मारच्या माध्यमातून अदानी समूहाने लोकांच्या घरातील स्वयंपाकघरात प्रवेश केला. या कंपनीच्या सर्वात मोठ्या ब्रँडचे नाव फॉर्च्युन आहे, जो देशातील सर्वात मोठा खाद्यतेल ब्रँड आहे. या रेंजमध्ये King’s, Aadhar, Bullet, Raag, Alpha, Jubilee, Avsar, Golden Chef आणि Fryola या ब्रँडचाही समावेश आहे. तेल व्यतिरिक्त, अदानी विल्मर रेशनसाठी लागणाऱ्या जवळपास सर्व गोष्टींचे उत्पादन करते. कंपनीने 2012-13 या आर्थिक वर्षात रेशन वस्तूंच्या श्रेणीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि फॉर्च्युन या ब्रँड नावाखाली आटा, डाळ, तांदूळ, मैदा, रवा, बेसन, साखर आणि सोया चंक्स विकण्यास सुरुवात केली. 2019 पासून या शेअरने 381 ते 878 पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे या कंपनीनीने 200 टक्के इन्कम दिला आहे.

पुणे-अहमदनगरसह देशातील ५७ कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका जाहीर; ‘या’ तारखेला होणार मतदान

5. अदानी टोटल गॅस

2004 मध्ये सुरू झाले, अदानी टोटल गॅस वाहनांना सीएनजी आणि पाईप्ड नॅचरल गॅस (पीएनजी) घरे आणि कारखान्यांना रिटेल करते. अदानी टोटल गॅसचे वितरण नेटवर्क गुजरातमधील वडोदरा आणि अहमदाबाद, हरियाणातील फरिदाबाद आणि उत्तर प्रदेशातील खुर्जासह अलाहाबाद, चंदीगड, एर्नाकुलम, पानिपत, दमण, धारवाड आणि उधम सिंग नगरमध्ये पसरलेले आहे. 2019 पासून या शेअरने 100 ते 4000 पर्यंतचा लांब लचक प्रवास केला आहे. म्हणजे या कंपनीनीने 40 पट पैसे करून दिले आहे.

6. अदानी ग्रीन एनर्जी

अदानी ग्रीन एनर्जी 2015 मध्ये अस्तित्वात आली आणि आज ती देशातील सर्वात मोठी अक्षय ऊर्जा कंपनी आहे. त्याची एकूण क्षमता 12.3 GW आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओबद्दल बोलायचे झाले तर त्यात पवन आणि सौर ऊर्जा प्रकल्पांचा समावेश आहे. 2019 पासून या शेअरने 40 ते 3050 पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे या कंपनीनीने 6000 टक्के इन्कम दिला आहे.

7. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज

आपला व्यवसाय वाढवत असताना, गौतम अदानी यांनी 2019 मध्ये विमानतळ क्षेत्रात प्रवेश केला. अहमदाबाद, लखनौ, मंगळुरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथील सहा विमानतळांचे आधुनिकीकरण आणि संचालन करण्याची जबाबदारी कंपनीकडे आहे. 2019 पासून या शेअरने 200 ते 4236 पर्यंत मजल मारली आहे. म्हणजे या कंपनीनीने 20 पट इन्कम दिला आहे.

गेल्या 4 वर्षात अदानी यांच्या सर्व कंपन्यांच्या शेअरचे भाव खूप वेगाने वाढलेले दिसतात म्हणजे 2019 ते आज फेब्रुवारी 2023 पर्यंत अदानी यांच्या कंपन्यांचे शेअरचे भाव 30 पट पेक्षा जास्त वाढलेले दिसून येतात. परंतु मागच्या महिन्यात अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर खाली आले. अन्यथा 2019 पासून अदानींच्या सर्वच कंपन्यांच्या शेअरने 50 पट पेक्षा जास्त इन्कम दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube