लोकशाहीमध्ये आणि भारतात हे व्हायला हवं; ट्रम्प ममदानींच्या भेटीनंतर थरूर यांचा कॉंग्रेसला सल्ला

Shashi Tharoor यांनी ट्रम्प यांनी विरोधी असलेल्या ममदानींच्या भेटीनंतर कॉंग्रेस आणि भारतीय राजकारण्यांना सल्ला दिला आहे.

Shashi Tharoor

This should happen in a democracy and in India; Tharoor’s advice to Congress after Trump Mamdani’s meeting : अमेरिकेची राजधानी न्यूयॉर्क शहरामध्ये नुकतच मेयर पदाची निवडणूक झाली यामध्ये ट्रम्प यांचे विरोधक झोहरान ममदानी हे मेयर झाले आहेत. निवडणूक प्रचारा दरम्यान प्रचंड विरोध केल्यानंतर ममदानी आणि ट्रम्प यांची व्हाईट हाऊटमध्ये बैठक पार पडली. त्यावरून कॉंग्रेस खासदार शशि थरूर यांनी कॉंग्रेस आणि भारतीय राजकारण्यांना सल्ला दिला आहे.

काय म्हणाले शशि थरूर?

ममदानी आणि ट्रम्प यांची व्हाईट हाऊटमध्ये बैठक पार पडली. त्यावरून सल्ला देताना थरूर यांनी एक एक्स पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेयर झोहरान ममदानी यांची बैठक झाली. लोकशाहीमध्ये असं व्हायला हवं, निवडणुकांमध्ये कडाडून विरोध, कितीही कडवी विधानं करा. पण निवडणुकांनंतर ज्या लोकांची, राष्ट्राची सेवा करण्याचे वचन तुम्ही दोघांनी घेतले आहे. त्यासाठी एकमेकांना सहकार्य करा. हे मला भारतात पाहायला आवडेल. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.

https://x.com/ShashiTharoor/status/1992111711147671981?r

दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून कॉंग्रेस खासदार शशि थरूर हे भाजप आणि हिंदूत्वाच्या बाजूने भूमिका घेताना दिसत आहेत. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर कॉंग्रेसमध्ये खळबळ माजली होती. त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा देखील सुरू झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा थरूर यांनी कॉंग्रसला सल्ला अन् सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे.

काँग्रेस हायकमांडचा आदेश हे त्यांचं वैयक्तिक मत, आघाडीत मनसेवरून राऊतांचा काँग्रेसवर वार

follow us