चित्रपट निर्मितीच्या सुविधा आता एकाच छताखाली; फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड व्यवस्था उभारणार
Film production रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी फिल्मसिटीमध्ये कॅमेरा टू क्लाउड उभारण्याचं अश्वासन दिलं
Film production facilities now under one roof; Camera to Cloud system to be set up in Filmcity : महाराष्ट्रातील असंख्य ठिकाण चित्रीकरणासाठी अनुकूल असल्याने महाराष्ट्रातील चित्रीकरण स्थळांना कायमच चित्रपटकर्मीकडून मागणी असते. त्यामुळे आता कॅमेरा टू क्लाउड अशी संपूर्ण व्यवस्था निर्माण करण्यासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी कटिबद्ध असून त्यादृष्टीने वेगवेगळे उपक्रम सक्षमपणे राबवले जात आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले. ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागातील परिसंवादात त्या बोलत होत्या.
‘दादासाहेब फाळके चित्रनगरी केवळ चित्रिकरणासाठी जागा देत नाही तर मराठी सिनेमाला पाठबळ देण्यासाठी अर्थसहाय्य करते, मराठी सिनेमा सातासमुद्रपार जावा यासाठी विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांच्या बाजार विभागात सहभागी होते, मराठी चित्रपटाला व्यासपीठ मिळावं यासाठी चित्रपताका हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव देखील आयोजित करण्यात येतो. त्याचबरोबर चित्रपट रसास्वाद उपक्रमातून चित्रपट रसिक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. थोडक्यात चित्रपट निर्मितीपासून ते दर्जेदार प्रेक्षक घडवण्यापर्यंतचा प्रवास चित्रनगरीच्या माध्यमातून पूर्ण केला जातो. या योजनांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे’, असेही त्या म्हणाल्या.
एसआयआर सुधारणा नाही, गुन्हा; 16 बीएलओंच्या मृत्यूचे दाखले देत राहुल गाधींचा भाजप अन् आयोगावर निशाणा
या परिसंवादात सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, निर्माता सुहृद गोडबोले यांनी सहभाग घेतला. परिसंवादाचे सूत्रसंचालन चित्रपट समीक्षक डॉ.संतोष पाठारे यांनी केले.५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या बाजार विभागात दादासाहेब फाळके चित्रनगरीने सहभाग नोंदवला असून चित्रनगरीचा आकर्षक स्टॉल बाजार विभागात उभा करण्यात आला आहे, चित्रपट निर्मात्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती स्टॉलच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
चित्रपटांना उत्स्फूर्त प्रतिसाद
महामंडळाच्या वतीने मुक्काम पोस्ट देवाचं घर आणि श्री गणेशा या दोन चित्रपटांचे प्रदर्शन बाजार विभागात करण्यात आले. विविध आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी चित्रपट पाहिला असून दोन्ही चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
