Download App

‘राहुल गांधी धोकादायक अन् विषारी माणूस…; कंगना रणौतचा हल्लाबोल

राहुल गांधी सर्वात हे धोकादायक माणूस आहे, ते कडू, विषारी आणि विनाशकारी असल्याची टीका कंगना रणौतने केली आहे.

  • Written By: Last Updated:

Kangana Ranaut : हिंडेनबर् अहवालाची (Hindenburg Report) सध्या देशात जोरदार चर्चा होत आहे. या अहवालात सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi)जोरदार टीका केली होती. माधवी पुरी-बुच (Madhavi Puri-Buch) यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? सुप्रीम कोर्ट स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणार का? असे अनेक सवाल राहुल गांधींनी केले होते. दरम्यान, आता खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut’) राहुल गांधींवर बोचरी टीका केली आहे.

Saade Maade Teen Sequel: अशोक मामाचा आणखी एका गाजलेल्या सिनेमाचा सीक्वेल; हा सुपरस्टार करतोय दिग्दर्शन 

राहुल गांधी सर्वात  धोकादायक माणूस आहे, तो कडू, विषारी आणि विनाशकारी असल्याची टीका कंगनाने केली आहे.

कंगनाने एक्सवर एक पोस्ट केली. त्यात लिहिलं की, राहुल गांधी हा सर्वात धोकादायक माणूस आहेत, तो कडू, विषारी आणि विध्वंसक आहे, त्यांचा अजेंडा असा आहे की जर ते पंतप्रधान बनू शकले नाहीत तर ते या देशालाही बरबाद करतील. आमच्या शेअर बाजाराला लक्ष्य करणाऱ्या हिंडनबर्ग अहवालाचे काल रात्री राहुल गांधी समर्थन करत होते, तो आता फोल ठरला आहे. ते या देशाची सुरक्षा आणि अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, अशी टीका कंगनाने केली.

‘…तर आमची समन्वयाची भूमिका’; मराठा आरक्षणावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका 

पुढं लिहिलं की, गांधीजी, तुम्ही आयुष्यभर विरोधी पक्षात बसण्याची तयारी ठेवा आणि जळत राहा, तुमच्यासारखी माणूस देशाच्या प्रगतीच्या आड येतोय, तुम्ही कलंक आहात, अशी बोचरी टीका कंगनाने केली.

हिंडेनबर्ग अहवाल काय होता?

अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचा एक नवीन अहवाल प्रसिद्ध झाला आहे.त्यात सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी-बुच यांच्यावर गंभीर आरोप. अदानींच्या शेअर बाजार घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचा खुलासा या अहवालातून करण्यात आला. हिंडेनबर्ग रिसर्चने 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, सेबीच्या अध्यक्षा माधबवी पुरी आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानीच्या मनी सिफनिंग घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या दोन्ही ऑफशोर फंडांमध्ये हिस्सा होता.

follow us