Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता. देशातील शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी 26 जुलै रोजी भारतात कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. (Kargil Vijay Diwas) दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये हा दिवस ‘गँग ऑफ फोर’ची भयंकर चूक म्हणून लक्षात ठेवला जातो. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांना या टोळीचा नेता म्हटलं जातं. मुशर्रफ यांनी भारतासोबतच्या युद्धासाठी कारगिल युद्धाची योजना आखली होती.
१२०० सैनिक मारले आज कारगिल विजय दिवस! पंतप्रधान युद्ध स्मारकावर जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहणार
‘गँग ऑफ फोर’ हा शब्द परवेझ मुशर्रफ यांच्या चार सेनापतींच्या संदर्भात वापरला जातो. त्यात जजनरल एहसान उल हक, जनरल अजीज खान, महमूद अहमद आणि शाहिद अजीज यांचा समावेश होता. हे चौघेही पाकिस्तानी लष्करात जनरल होते. या लोकांसह परवेझ मुशर्रफ यांनी कारगिल युद्ध सुरू केलं. यानंतर नवाझ शरीफ यांच्याविरोधात सत्तापालटही करण्यात आली. या चार अधिकार्यांच्या चुकीमुळे पाकिस्तानचे सुमारे १२०० सैनिक मारले गेल्याचं पाकिस्तानमध्ये बोललं जातं. या युद्धाने पाकिस्तानला अशा जखमा दिल्या, ज्या अद्यापही भरल्या नाहीत.
युद्धामुळे आर्थिक स्थिती बिघडली
1999 मध्ये पाकिस्तानी घुसखोरांनी कारगिलची उंच शिखरे काबीज केली. यानंतर भारतीय लष्कराने ऑपरेशन विजय सुरू केलं. या अंतर्गत मे ते जुलै 1999 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं. या युद्धात भारताचा विजय झाला आणि भारतीय लष्कराने पाकिस्तानी घुसखोरांना मारलेच नाही, तर कारगिलमधूनही हुसकावून लावलं. युद्धामुळे पाकिस्तानची आर्थिक स्थितीही बिकट झाली. भारताने पाकिस्तानला समुद्रात रोखले.त्यामुळे त्यांच्या सागरी व्यापारावर मोठा परिणाम झाला आणि नवाझ शरीफ यांनीही हे मान्य केलं.
बदल्यात काश्मीर पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाकडून अतिमुसळधारचा अंदाज, वाचा कुठं कोणता अलर्ट?
कारगिल युद्धाच्या वेळी जनरल परवेझ मुशर्रफ लष्करप्रमुख होतं. त्याचवेळी जनरल अजीज खान हे चीफ ऑफ जनरल स्टाफ होते. याशिवाय अजीज आयएसआयमध्येही होता. या काळात ते काश्मीरची जबाबदारी सांभाळत होते. अजीजने पाकिस्तानी घुसखोरांना भारतीय सीमेवर पाठवायला सुरुवात केली आणि त्यातूनच काश्मीरमध्ये अशांतता पसरवली गेली. कारगिल युद्धाच्या बदल्यात काश्मीर ताब्यात घेण्याची या चार जनरल आणि मुशर्रफ यांची योजना होती. घुसखोरांना हटवण्यात भारतीय लष्कराला अडचणींचा सामना करावा लागेल, असं या लोकांना वाटत होते. पण तसं झाले नाही आणि कारगिल युद्ध भारताने जिंकलं.