भारत की पाकिस्तान..वनडे मध्ये सर्वाधिक शतकं कुणाच्या नावावर?, वाचा खास माहिती..
IND vs PAK : एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकं कोणत्या टीमने केले? भारत आणि पाकिस्तान संघांनी (IND vs PAK) किती शतके केली? कोणता संघ आघाडीवर आहे? असे प्रश्न तुम्हाला थोडे आश्चर्यकारक वाटू शकतात. पण या प्रश्नांचं उत्तर मिळालं आहे. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके करणारा देश भारत (Team India) आहे. ५० ओवर्सच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंत ३१९ शतके केली आहेत. यामध्ये सर्वाधिक योगदान विराट कोहली (Virat Kohli) आणि मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर या (Sachin Tenulkar) दोघांचे आहे. विराटने ५० तर सचिनने ४९ शतके ठोकली आहेत.
भारताच्या बाबतीत आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे वन डेमध्ये तीनशे पेक्षा जास्त शतके करणारा भारत हा एकमेव देश आहे. भारतानंतर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या (Australia) क्रमांकावर आहे. एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत २५० शतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ३० शतके रिकी पाँटिंगच्या नावावर (Rickey Ponting) आहेत. ऑस्ट्रेलिया नंतर तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या संघाने (Pakistan Cricket) आतापर्यंत २२३ शतके लगावली आहेत. माजी फलंदाज सईद अन्वरने सर्वाधिक २० शतके केली आहेत.
T20 WC : चर्चेत राहण्यासाठी नव्हे तर, अलिखित नियमासाठी मोदींनी लावला नाही ‘ट्रॉफी’ला हात
भारत आणि पाकिस्तानात ९६ शतकांचे अंतर
वनडे शतकांच्या बाबतीत भारत पाकिस्तान पेक्षा खूप पुढे आहे. भारताने पाकिस्तानपेक्षा ९६ आणि ऑस्ट्रेलियापेक्षा ६९ शतके जास्त लगावली आहेत. शतकांच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका (South Africa) टीम चौथ्या क्रमांकावर आहे. या टीमने आतापर्यंत २०९ शतके केली आहेत. यामध्ये हाशिम अमलाने एकट्यानेच २७ शतके केली आहेत. २०१ शतकांसह वेस्ट इंडीज पाचव्या (West Indies) क्रमांकावर आहे. विंडीज संघासाठी ख्रिस गेलने (Chris Gayle) सर्वाधिक २५ शतके केली आहेत.
आघाडीचे संघ टॉप पाचमधून बाहेर
दोनशेपेक्षा कमी शतके लगावणारे आघाडीचे संघ टॉप ५ मधून बाहेर आहेत. १९८ शतकांसह इंग्लंड सहाव्या (England) क्रमांकावर आहे. १९४ शतकांसह श्रीलंका सातव्या (Sri Lanka Cricket) क्रमांकावर आहे. १५८ शतकांसह न्युझीलंड संघ आठव्या क्रमांकावर आहे. ६९ शतकांसह बांगलादेश नवव्या तर ५२ शतकांसह आयर्लंड दहाव्या क्रमांकावर आहे.
रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricket मधून निवृत्ती