Ricky Ponting : अखेर पाँटिंगच्या एक हजार बॅटचं रहस्य उलगडलं! स्वतः च केला मोठा खुलासा
Ricky Ponting : दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (Ricky Ponting) सांगितले की मी ज्या सामन्यात शतक केले त्या सामन्यातील प्रत्येक बॅट सांभाळून ठेवली आहे. रिकी पाँटिंग त्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक होता. युवा खेळाडूंना क्रिकेट कीट वाटप कार्यक्रमात रिकी पाँटिंगने हा खुलासा केला. रिकी पाँटिंगने सन 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने क्रिकेट कारकीर्दीत एकूण 71 शतके केली आहेत. यामध्ये 41 कसोटी शतकांचा समावेश आहे.
पाँटिंग पुढे म्हणाला, तुम्ही विश्वास करा अथवा करू नका. पण आजमितीस माझ्या घरी एक हजार बॅट आहेत. ज्या बॅटच्या मदतीने मी आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक केले ती प्रत्येक बॅट मी सांभाळून ठेवली आहे. या बॅटवर मी स्कोअर आणि विरोधी संघाचे नावही लिहून ठेवले आहे.
T20 World Cup : ‘वर्ल्डकप’मध्ये कुणाला संधी, कुणाचा पत्ता होणार कट? 20 खेळाडूंची यादी मिळाली
रिकी पाँटिंगने त्याच्या कारकीर्दीत अनेक आठवणीत राहतील अशा मॅचविनिंग खेळी साकारल्या. त्याच्याच नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाने दोन वेळा एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं. 2003 मधील विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्ध त्याने नाबाद 140 धावा केल्या होत्या. या सामन्यात सौरव गांगुली भारतीय संघाचा कर्णधार होता. तोही आता उपस्थित होता. गांगुली म्हणाला, मी तेरा वर्षांचा होतो त्यावेळी मी पहिली बॅट खरेदी केली होती. बॅटने चेंडू टोलवल्यानंतर त्याला हवेत उंच जाताना पाहून मला खूप आनंद व्हायचा.