T20 World Cup : ‘वर्ल्डकप’मध्ये कुणाला संधी, कुणाचा पत्ता होणार कट? 20 खेळाडूंची यादी मिळाली

T20 World Cup : ‘वर्ल्डकप’मध्ये कुणाला संधी, कुणाचा पत्ता होणार कट? 20 खेळाडूंची यादी मिळाली

T20 World Cup 2024 : आगामी टी 20 विश्वचषकाची तयारी सुरू झाली (T20 World Cup 2024) आहे. ही स्पर्धा जून महिन्यात अमेरिका आणि वेस्टइंडिज या दोन देशांत होणार आहे. या स्पर्धेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. मात्र कोणत्या खेळाडूंची निवड होऊ शकते याची माहिती समोर आली आहे. सध्या भारतात सुरू असलेल्या टी 20 लीग स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचावर्ल्डकपसाठी विचार होईल याची शक्यता दिसत नाही. आयसीसीने 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यासाठी 1 मे मुदत निश्चित केली आहे.

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते. जर या दोघांचीही निवड झाली तर रिंकू सिंह आणि शिवम दुबे या दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकेल. विकेटकीपरसाठी संजू सॅमसन, जितेश शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन या खेळाडूंचा पर्याय आहे. या खेळाडूंमधून एकाची निवड होण्याची शक्यता आहे.

T20 World Cup साठी रोहित-विराज सज्ज! बीसीसीआयच्या बैठकीत ओपनिंग धुरा दोघांच्या खांद्यावर

हार्दिक पांड्या महत्वाचा खेळाडू आहे. परंतु, तो सध्या वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे. टी 20 स्पर्धे त्याची आतापर्यंतची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. तरीदेखील संघात त्याची निवड होईल यात शंका नाही. तसेच विराट कोहली, कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंह, सिराज, कुलदीप यादव यांची निवड निश्चित मानली जात आहे.

शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांचा विचार केला तर गिलने सध्याच्या टी 20 स्पर्धेत फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. तर जैस्वालही सातत्याने चांगली कामगिरी करत आहे त्यामुळे त्याच्याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. या दोघांतून एकाची निवड करणे निवडकर्त्यांसाठी कसरतीचे ठरणार आहे. जर दोघांचीही निवड झाली तर रिंकू सिंह किंवा शिवम दुबे यांपैकी एका जणाचा पत्ता कट होऊ शकतो.

T20 World Cup : टी 20 विश्वचषकासाठी ICC कडून अँथम साँगची घोषणा, टीजरही लाँच

अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि रवी बिश्नोई यां तीन खेळाडूंमध्ये राखीव फिरकी गोलंदाजासाठी स्पर्धा होणार आहे. अक्षर हा डावखुरा फिरकीपटू असला तरी तो फलंदाजीही चांगली करतो. चहलने त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत एकही टी 20 विश्वचषक खेळलेला नाही. पण गोलंदाजी कौशल्यात तो या दोघांच्याही पुढे आहे. असे असले तरी त्याला याआधी अनेकदा संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे यावेळच्या विश्वचषकात त्याची निवड होते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज