भावाकडूनच Hardik Pandya ची कोट्यावधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भावाकडूनच Hardik Pandya ची कोट्यावधींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Hardik Pandya Cheated by brother for crores : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या ( Hardik Pandya) याची कोट्यावधी रुपयांची फसवणूक झाली आहे. विशेष म्हणजे हार्दिकच्या भावाकडूनच ही फसवणूक ( Cheated by brother ) करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या ( Mumbai Police ) आर्थिक गुन्हे शाखेकडून हार्दिकचा सावत्र भाऊ असलेल्या वैभव पंड्या याला अटक करण्यात आली आहे.

“तुम्ही मला मूर्ख समजू नका”, विजय शिवतारेंबद्दलचा प्रश्न अन् अजितदादा संतापलेच..

मुंबईमध्ये पंड्या भावांची भागीदारी असलेल्या एका फॉर्ममध्ये जवळपास 4.3 कोटींची अफरातफर करण्यात आली आहे. ज्यामुळे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि त्याचा सख्खा भाऊ कृणाल पंड्या यांचं कोट्यावधींच नुकसान झालं आहे. या प्रकरणी हार्दिक आणि कृणाल यांचा सावत्र भाऊ असलेल्या वैभव पांड्या याच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.

Lok Sabha Election ड्युटीवर न येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई; निवडणूक आयोग ठाम

2021 मध्ये हार्दिक, कृणाल आणि वैभव या तिघा भावांनी भागीदारीमध्ये एक पॉलिमर व्यवसाय सुरू केला होता. ज्यामध्ये हार्दिक आणि कृणाल यांची प्रत्येकी 40% तर सावत्र भाऊ वैभवचे 20% भांडवल होतं. तर बिझनेस सांभाळण्याची जबाबदारी वैभवची होती. तसेच आलेला नफा हा देखील भांडवलाच्या प्रमाणात वितरित केला जाणार होता.

मात्र हार्दिकचा सावत्र भाऊ वैभव याने या अटींचं उल्लंघन केलं. याच बिझनेसचं आणि आणखी एक फॉर्म उघडलं. ज्यामुळे मुख्य कंपनीचं तीन कोटींपेक्षा अधिक रुपयांचं नुकसान झालं. तसेच त्याने स्वतःचा नफा 20 टक्क्यांवरून वाढवून 33 टक्के केला. नवीन फॉर्म सुरु केलं त्याचा लाखोंचा नफा स्वतःच्या खात्यावर वळवला या प्रकरणी पंड्या ब्रदर्सने वैभवशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्यांना धमकी दिली. त्यामुळे अखेर हार्दिक आणि कृणाल यांनी वैभवची तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube