“तुम्ही मला मूर्ख समजू नका”, विजय शिवतारेंबद्दलचा प्रश्न अन् अजितदादा संतापलेच..

“तुम्ही मला मूर्ख समजू नका”, विजय शिवतारेंबद्दलचा प्रश्न अन् अजितदादा संतापलेच..

Ajit Pawar Comment on Vjiay Shivtare : निवडणूक लढण्याचा इरादा पक्का करत महायुतीत खळबळ उडवून देणाऱ्या माजी मंत्री विजय शिवतारे यांनी (Vijay Shivtare) काहीच दिवसांत माघार घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या नेते मंडळींचे हसऱ्या चेहऱ्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यामुळे आता विजय शिवतारे बारामतीत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करतील असे सध्या तरी दिसत आहे. मात्र मागील काही दिवसांपूर्वी त्यांनी जी आक्रमक भूमिका घेतली होती. त्याची चर्चा मात्र अजूनही सुरुच आहे. याच मुद्द्यांवर आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना (Ajit Pawar) प्रश्न विचारले. त्यावर अजितदादा मात्र चांगलेच संतापल्याचे दिसून आले.

अजित पवार आज पुण्यात होते. येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना मागील महिन्यात चर्चेत आलेल्या विजय शिवतारेंच्या बंडखोरीच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला. त्याव अजितदादा म्हणाले, विजय शिवतारे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी एकत्र बसलो होते. त्यावेळी विजय शिवतारे यांनी त्यांच्या भागातील प्रश्न आमच्यासमोर मांडले.

Ajit Pawar : आता साहेबांच्या सुनेला निवडून द्या; सुनेत्रा पवारांसाठी अजितदादांचं बारामतीकरांना आवाहन

मी महायुतीबरोबरच आहे पण काही विषय आहेत ते सरकारने मार्गी लावायला हवेत असे विजय शिवतारे म्हणाले होते. त्याचवेळी मी त्यांना सांगितलं होतं की एक दिवस सभा आयोजित करतो. त्या सभेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही हजर राहावं. त्यानुसार आज सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत.

यावेळी पत्रकारांनी विजय शिवतारेंना कुणाकुणाचे फोन आले होते असा प्रश्न विचारला. त्यावर मात्र अजितदादा चांगलेच संतापले. तुम्ही मला मूर्ख समजू नका. मी जितकं सांगायचं तितकं सांगितलं आहे. मला संविधानाप्रमाणे जेवढं बोलायचं आहे तेवढं मी बोललो आहे अशा शब्दांत अजित पवार यांनी पत्रकारांना उत्तरे दिली.

Ajit Pawar : पक्षाच्या विरोधी भूमिका घेतल्यास, पक्ष सोडण्याच्या चर्चांवर निलेश लंकेंना अजितदादांचा इशारा

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube