पक्ष फोडून अजित पवारांना काय मिळालं? शरद पवार गटाने पुन्हा डिवचलं

पक्ष फोडून अजित पवारांना काय मिळालं? शरद पवार गटाने पुन्हा डिवचलं

Sharad Pawar Group On Ajit pawar : राष्ट्रवादीत उभी फूट पाडून अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी केली. त्यानंतर अजितदादा शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. तेव्हापासून शरद पवार आणि अजित पवार गटामध्ये जोरदार धुमश्चक्री होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा एकदा शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) अजित पवार गटाला (Ajit Pawar Group) डिवचलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत पक्ष फोडून अजित पवारांना काय मिळालं? याचा लेखाजोखाच शरद पवार गटाने मांडला आहे.

शरद पवार गटाकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये ‘घटनाबाह्य राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवारांची पहिली लोकसभा निवडणूक’ असल्याचा टोला लगावला आहे. तसेच रिल लाईफ आणि रिअल लाईफचा संदर्भ देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.

सनी लिओनी आणि प्रभुदेवा पुन्हा येणार एकत्र; बॉलिवूडच्या सर्वात मोठ्या चित्रपटाचं शुटिंग सुरु

रिल लाईफमध्ये अजित पवार एकूण 15 ते 16 जागांवर लोकसभा निवडणूक लढवत असत, त्यातील 12 ते 12 जागांवर विजय मिळवत होते. आता मात्र रिअल लाईफमध्ये त्यांना महायुतीत लोकसभेच्या जागांसाठी संघर्ष करावा लागला आहे. त्यातूनही अवघ्या 4 जागा मिळाल्या असून उमदेवार नसल्याने स्वत:च्या पत्नीला एका जागेवर निवडणुकीत उभं केलं आहे. उमेदवार नाहीत म्हणून दोन जागांसाठी उमेदवार आयात केले आहेत. तर आधीपासूनच खासदार असलेल्या प्रदेशाध्यक्षाला उमेदवारी देण्यात आल्याची टोलेबाजी शरद पवार गटाकडून पोस्टमध्ये करण्यात आली आहे. अखेरीस ‘पक्ष फोडून अजित पवारांनी काय मिळवलं?’ असा खोचक सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

‘साखरपुडा झाला पण, लग्न झालं नाही, हातकणंगलेची चर्चा कुठं अडली?’ सतेज पाटलांनी काय सांगितलं?

दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील समर्थक आमदारांना घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल झाले आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीत महायुतीत असताना त्यांना अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. त्यावरुन शरद पवार गटाने अजित पवार गटाला टार्गेट करीत पुन्हा डिवचलं आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जोरदार घमासान सुरु असल्याचं दिसून आलं. अखेर महाविकास आघाडी आणि महायुतीचा जागावाटपाचा तिढा बऱ्यापैकी सुटला असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार गटाला महायुतीकडून सहा जागा मिळाल्या आहेत त्यातीलही परभणी लोकसभा मतदारसंघात रासपचे महादेव जानकरांना देण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादांना मूळ पाचच जागा मिळाल्या असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून आठ उमेदवारांची नावे जाहीर केली असून शिंदेंना 13 जागा मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज