Mahadev Jankar यांच्यासाठी अजित पवार भर उन्हात रिंगणात तर विटेकरांनाही दिलं आश्वासन
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर ( Mahadev Jankar ) परभणीतून लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढणार आहेत. जानकर यांनी आज (1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर महायुतीकडून जानकारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी आपल्या कोट्यातून उमेदवारी दिलेल्या जानकरांसाठी भर उन्हात भाषण केलं. तर राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना विधिमंडळात घेण्याचं आश्वासन दिलं.
Loksabha Election 2024 : साताऱ्याच्या जागेवर नेमकं कोण लढणार? पृथ्वीराजबाबांनी केली भूमिका जाहीर
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक गावकीची किंवा भावकीची नसून देशाचे भवितव्य ठरवणारी आहे. या अगोदर निवडून दिलेल्या खासदारांनी काय दिवे लावले? असं म्हणत अजित पवार यांनी ठाकरे गटाचे खासदार असलेले संजय जाधव यांच्यावर टीका केली. तर जानकरांचं भरभरून कौतुक करत मतदारांना परभणीमधून महादेव जानकर यांना निवडून देण्यासाठी आवाहन केलं.
‘सोडून गेलेल्या सरदारांनी लाचारी पत्करली’; जयंत पाटलांचा अजितदादांना टोमणा
पुढे ते म्हणाले की, ही जागा राष्ट्रवादीची होती. मात्र आम्ही बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारे लोक आहोत. त्यामुळे वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही आमच्या कोट्यातून जानकरांना उमेदवारी दिली. आमच्या पक्षात देखील अनेक जण इच्छुक होते. मात्र वरिष्ठांनी महायुतीच्या माध्यमातून घेतलेला निर्णय सर्वांनी सहमती दाखवली आहे.
टायगर श्रॉफने खिलाडीला बनवले एप्रिल ‘फूल’! बडे मियाँसोबत केला असा प्रँक, पाहा व्हिडिओ
तसेच उमेदवारी न मिळालेल्या राष्ट्रवादीच्या राजेश विटेकरांना देखील पक्ष नाराज करणार नाही. पुढील सह महिन्यात त्यांना विधिमंडळात घेऊन त्यांचे पुर्नवसन केलं जाईल. असं आश्वासन देखील अजित पवार यांनी विटेकरांना दिलं. तर कार्यकर्त्यांना ही निवडणूक लढताना स्वतःच्या उमेदवाराप्रमाणे काम करण्याचे आदेश दिले.
जानकर हे महाविकास आघाडीसोबत माढ्यातून लोकसभा लढणार असल्याची चर्चा होती. मात्र, 24 मार्च रोजी झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांकडून जानकर यांची यांची मनधरणी करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपाच जानकर यांना एक जागा निश्चित करण्यात आली होती. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. परभणीची जागा रासपला राष्ट्रवादीच्या कोट्यातून सोडण्यात आल्याचे तटकरे यांनी सांगितले. त्यामुळे आता महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत. त्यानंतर जानकर यांनी आज (1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर लगेचच त्यांच्यासाठी प्रचारसभा देखील घेण्यात आली आहे.