T20 World Cup साठी रोहित-विराज सज्ज! बीसीसीआयच्या बैठकीत ओपनिंग धुरा दोघांच्या खांद्यावर

T20 World Cup साठी रोहित-विराज सज्ज! बीसीसीआयच्या बैठकीत ओपनिंग धुरा दोघांच्या खांद्यावर

Rohit Sharma-Virat Kohli opening for India in the T20I World Cup : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI ) मुख्यालयात मुख्य निवडकर्ता अजित आगरकर, टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार टी 20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोघांना भारताकडून ओपनिंग करावी लागणार अशी शक्यता आहे.

”माढ्यात पवार पॅटर्नची हवा, विजय मिळवताना घाम निघणार; सोलापुरचं मैदानही कठीण”

दुसरीकडे सध्या भारतात टी 20 लीग स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा संपल्यानंतर जून महिन्यात टी 20 विश्वचषकाचा रणसंग्राम रंगणार आहे. मात्र आगामी टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यासाठीच ही बैठक पार पडली. ज्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार टी 20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली ( Virat Kohli) या दोघांना भारताकडून ओपनिंग करावी लागणार अशी शक्यता आहे.

वसंत मोरेंना PM व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत; अमित ठाकरेंचा खोचक टोला

तसेच या बैठकीमध्ये हार्दिक पांड्याबाबत महत्वाची बातमी समोर आली आहे. हार्दिकला जर विश्वकप संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला सध्या देशात सुरू असलेल्या टी 20 लीग स्पर्धेत सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. रोहित शर्माच्या उपस्थितीत निवड समितीची बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. आता हार्दिक पांड्याची निवड त्याच्या गोलंदाजीवर अवलंबून राहणार आहे.

कारण सध्या भारतात टी 20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये हार्दिक पांड्या अपयशी ठरत आहे. फलंदाजीत बऱ्यापैकी चमकला मात्र गोलंदाजीत तो पूर्ण फ्लॉप ठरला आहे. त्याच्या नेतृत्वातील मुंबईच्या संघाची कामगिरीही सुमार राहिली आहे. फलंदाजी करताना हार्दिकने 6 सामन्यात 26.20 च्या सरासरीने 131 धावा केल्या आहेत. गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर या सहा सामन्यांत त्याने फक्त 3 विकेट घेतल्या आहेत. धावा देतानाही त्याचा इकॉनॉमी रेट 12 राहिला आहे. म्हणजेच त्याची गोलंदाजी अत्यंत सुमार राहिल्याचे दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज