माढ्यात पवार पॅटर्न! विजय मिळवताना घाम निघणार; सोलापुरचं मैदानही कठीण; चंद्रकांत पाटलांची कबुली

माढ्यात पवार पॅटर्न! विजय मिळवताना घाम निघणार; सोलापुरचं मैदानही कठीण; चंद्रकांत पाटलांची कबुली

Madha Lok Sabha Election : एकीकडे महायुतीत (Mahayuti) काही जागा वाटपाचं भिजत घोंगडं असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटलांनी (Chandrakant Patil) सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाबाबत विधान केले आहे. त्यांच्या या विधानानं महायुतीतील नेत्यांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. भाजपसाठी (BJP) सोलापूर लोकसभेची निवडणूक (Solapur Lok Sabha Election) थोडीशी कठीण तर, माढा लोकसभेची निवडणूक (Madha Lok Sabha Election) जरा जास्तच कठीण असल्याचे म्हटले आहे.

चंद्रकांतदादांच्या या विधानाुमळे माढ्यात शरद पवारांनी मैदानात उतरवलेला भिडूच विजय मिळवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकीकडे या दोन्ही मतदारसंघात भाजपच्या विजयाबद्दल चंद्रकांत पाटलांनी चिंतेत टाकणारे विधान जरी केले असले तरी, दुसरीकडे त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत.

लोकसभेच्या निवडणुकांसाठी राज्यातील मतदारांच्या मनात नेमकं काय? याचा आढावा घेणारा 48 मतदारसंघातील ओपिनियन पोल (Opinion Poll) समोर आला आहे. या पोलनुसार राज्यात महायुतीला लोकसभा निवडणुकीत धक्का लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच काय तर, महायुतीला राज्यात केवळ 30 जागा मिळतील असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. या पोलनंतर महायुतीच्या नेत्यांना घाम फुटलेला असताना चंद्रकांतदादांनी सोलापूर आणि माढा मतदार संघाचा पेपर कठीण असल्याची कबुली दिली आहे.

नेमके काय म्हणाले चंद्रकांतदादा

शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी मंगळवेढा शिवसैनिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. यावेळी त्यांनी भाजपसाठी सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण असल्याची कबुली दिली. तर, दुसरीकडे सर्व्हेचे अंदाज काहीही असो आम्ही राज्यात 45 लोकसभा जागा जिंकणारच असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिवाय ज्या तीन जागा अडचणीच्या वाटत आहेत त्यादेखील मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी म्हटले आहे.

… म्हणून छगन भुजबळ संतापले, महायुतीच्या नेत्यांना दिली 20 मेची डेडलाईन

माढ्यात रंगणार मोहिते पाटील विरूद्ध निंबाळकर लढत

ज्या माढ्याचा उल्लेख करत चंद्रकांतदादांनी चिंता व्यक्त केली आहे. त्या माढ्यात काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी भाजपला मोठा धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यांना तेथून उमेदवारी देखील देण्यात आली आहे. तर, भाजपकडून या ठिकाणी रणजितसिंग निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली असून, मोहिते पाटलांच्या उमेदवारीनंतर भाजपला माढ्याचा पेपर अवघड असल्याचे बोलले जात आहे. त्यात आता चंद्रकांतदादांनीही याबाबत चिंंता व्यक्त केल्याने माढ्यात लोकसभेसाठी पवार पॅटर्न हवा करणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मागील निवडणुकीत निंबाळकरांच्या विजयामध्ये मोहिते पाटील कुटुंबियांचा मोठा वाटा असल्याचं दिसून आलं होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील आणि निबाळकर यांच्यातच थेट लढत होणार असल्याने नेमका विजय कुणाचा होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज