IND vs WI : पाऊस आला अन् खेळ केला! दुसरा सामना ड्रॉ; टीम इंडियाने मालिका जिंकली

IND vs WI : पाऊस आला अन् खेळ केला! दुसरा सामना ड्रॉ; टीम इंडियाने मालिका जिंकली

IND vs WI : भारतीय संघाच्या वेस्टइंडिज दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने 1 डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला होता. दुसरा सामना जिंकून मालिका विजय साकारण्याचे स्वप्न मात्र भंगले आहे. पावसामुळे दुसरा सामना अनिर्णित राहिला. तरी देखील भारताने ही मालिका 1-0 ने खिशात टाकली.

धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; म्हणाले, “क्या खुदा ने मंदिर तोडा…”

या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. संघान 438 धावा केल्या. विराट कोहलीने सर्वाधिक 121 धावांची खेळी केली. कर्णधार रोहित शर्मा 80, यशस्वी जयस्वालने 57, रविंद्र जडेजा 61 आणि आर. अश्विनने 56 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्टइंडिजचा संघ मात्र अपयशी ठरला. संघाने फक्त 255 धावा केल्या. कर्णधार क्रेग ब्रेथवेटने एकाकी झुंज देत 75 धावा केल्या. भारतीय संघाचा गोलंदाज सिराजने या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाने आपला दुसरा डाव 181 धावांवर घोषित केला होता. शेवटच्या दिवशी सामना जिंकण्यासाठी वेस्टइंडिज संघाला 289 धावा करायच्या होत्या. मात्र, पाऊस सुरू असल्याने एकही बॉल टाकता आला नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिल्याचे घोषित करण्या आले. सिराजला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला.

पाकिस्तानचा फायदा, टीम इंडियाला धक्का

दरम्यान, दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाल्याने टीम इंडियाचे नुकसान झाले आहे तर पाकिस्तानचा फायदा झाला आहे. दोन्ही संघांना समान गुण वाटप झाल्याने WTC मधील भारतीय संघाची विजयाची टक्केवारी घसरली. त्यामुळे पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या गुणतालिकेत पाकिस्तान 100 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाला 66.67 टक्क्यांमुळे दुसरा क्रमांक मिळाला आहे. ऑस्ट्रेलिया 54.17, इंग्लँड 29.17 हे संघ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकांवर आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube