धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; म्हणाले, “क्या खुदा ने मंदिर तोडा…”

धर्मवादावरुन Ashutosh Rana यांची परखड भूमिका; म्हणाले, “क्या खुदा ने मंदिर तोडा…”

Ashutosh Rana Post: मणिपूरमध्ये दोन महिलांची निर्वस्त्र परेड घेत असताना व्हिडिओमुळे माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडल्याचे दिसून आले आहे. तसेच महिलांबरोबर घडलेल्या या गैरकृत्याला देशातून टीकास्त्र होत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी विनंती सरकारला करत असल्याचे दिसून येत आहेत. तसेच काही मंडळीकडून आरोप-प्रत्यारोप होत असल्यसिक्सचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते, साहित्य जगत, कलाक्षेत्र, राजकीय क्षेत्रात अशा अनेक नेतेमंडळी या सर्वांकडून येथील सरकारवर टीका केली जात आहे.

तसेच अभिनेते आशुतोष राणा यांची गणना सामाजिक मुद्द्यांबद्दल सतर्क व परखडपणे भूमिका मांडणाऱ्या कलाकारांमध्ये केले जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. नुकताच अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी त्यांचा शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. आशुतोश राणा यांनी नुकतंच मणिपूरमधील घटनेविषयी चांगलेच फत्करल्याचे दिसून येत आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हणाले आहे की “इतिहास साक्ष आहे. जेव्हा समाजविघातक प्रवृत्तींनी महिलेचं अपहरण किंवा तिच्या अब्रूवर हात घातला आहे.

तेव्हा त्याची किंमत संपूर्ण मानवजातीला चुकवावी लागली आहे”, अशा तिखट शब्दामध्ये राणा यांनी ट्विटरवर या घटनेबद्दल संताप व्यक्त केला होता. त्यांचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. आता अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी धर्मांध लोकांना जोरदार फटकारले आहे, त्यांचा व्हिडीओ आता आशुतोष राणा यांनी शेअर केला आहे.

काय आहे नेमकं या व्हिडीओमध्ये पाहा?

हा व्हिडीओ आजतक वाहिनीच्या एका कार्यक्रमामधील असल्याचे दिसून येत आहे. त्या वाहिनीच्या अँकरने आशुतोष राणा यांना “कलाक्षेत्र देशात सध्या काय घडतंय हे समजू शकतंय का?” असा सवाल करण्यात आला आहे. त्यावर आशुतोष राणा यांनी एका कवितेच्या माध्यमातून परखड प्रतिक्रिया दिल्याचे दिसून आले आहे.

बाँट दिया इस धरती को
चांद सितारो का क्या होगा
नदीयों के कुछ नाम रखे
बेहेती धारों का क्या होगा
शिव की गंगा भी पानी है
आब ए जमजम भी पानी है
मुल्ला भी पिये, पंडित भी पिये
पानी का मजहब क्या होगा
इन फिरका परस्तों से पूछें
क्या सूरज नया बनाओगे
एक हवा में साँस है सबकी
क्या हवा भी नई चलाओगे
नस्लों का करें जो बटवारा
रेहबर वो कौम का ढोंगी है
क्या खुदा ने मंदिर तोडा था
या राम ने मस्जिद तोडी है…

अशा शब्दांत कवितेच्या माध्यमातून आशुतोष राणा यांनी सध्याच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मणिपूरमध्ये ३ मे पासून हिंसाचाराचे वातावरण आहे, दोन समुदायांमध्ये सुरू असलेल्या या हिंसाचारात आतापर्यंत १६० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि महिलांवरील या अत्याचाराने देशभरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube